Home Uncategorized मराठा आरक्षणाबाबत तातडीने तोडगा काढा

मराठा आरक्षणाबाबत तातडीने तोडगा काढा

67
0

: बीडमधील सर्वपक्षीय आमदारांचे विखे- पाटील यांना साकडे

मुंबई

मुंबईत आझाद मैदानावर सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा वाढत असताना; विरोधकांबरोबरच सत्ताधारी आमदारही याबाबत उघड भूमिका घेताना दिसत आहेत.
” सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन; त्याबाबत तोडगा काढावा.” अशी मागणी बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी केली आहे.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांना शनिवारी याबाबत निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. संदीप क्षीरसागर, अजित पवार गटाचे आ. प्रकाश साळुंखे, आ. विजयसिंह पंडीत व भाजपा आ.सुरेश धस यांनी एकत्रितपणे ही मागणी केली आहे. त्यामुळे सरकारमधील पक्षांतील मराठा आमदारांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
आझाद मैदानावर शुक्रवारपासून सुरू झालेल्या आंदोलनाला या चारही आमदारांनी भेट देऊन जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर ते आज सकाळी उपसमितीचे अध्यक्ष ना. विखे -पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपस्थित राहिले.
यावेळी मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा निघावा यासाठी, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका मांडली.तसेच, आझाद मैदान परिसरात आंदोलनकर्त्या मराठा समाज बांधवांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशीही मागणी केली.
आंदोलन करणे हा लोकशाहीतील एक मूलभूत अधिकार आहे, याची जाणीव करून दिली. त्याबाबतचे निवेदनही सादर केले.
या बैठकीला ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले , ना.दादा भुसे, ना. बाबासाहेब पाटील, ना.मकरंद पाटील , ना.माणिकराव कोकाटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here