Home Uncategorized *वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवार, दि २७ ऑगस्ट रोजी...

*वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवार, दि २७ ऑगस्ट रोजी राहणार खुले!

63
0

गुरुवार, दि २८ ऑगस्ट रोजी राहणार बंद*

‘श्री गणेश चतुर्थी’ निमित्त बुधवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. असे असले तरी, बुधवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी बंद असेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळवण्यात आले आहे.

भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.

सबब, या ठरावानुसार बुधवार दि २७ ऑगस्ट २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here