आ. सना मलिक – शेख यांचे संबंधित यंत्रणांना बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश!
मुंबई
मुंबईत कोसळणार्या मुसळधार पावसाने न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षक भिंत कोसळून घरांचे नुकसान झाले मात्र जिवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली
दरम्यान या घटनेनंतर अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी भेट देत, बाधित कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षण भिंतीच्या बाजूला असलेली दोन बंद घरे संरक्षण भिंतीसह खाली कोसळली, त्यामुळे भिंतीच्या खालील बाजूस असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच आ. सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.
बाधित कुटुंबांसाठी तात्पुरते पुनर्वसन आणि मुलभूत सुविधांची व्यवस्था तातडीने करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग, एम- पुर्व वॉर्ड देखभाल विभागाशीही आ. सना मलिक – शेख यांनी संपर्क साधून अग्निशमन दल तसेच आरसीएफ पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना तत्काळ भिंत कोसळलेल्या ठिकाणी बोलावले.
रविवारीच घटनास्थळाचा आरसीएफ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून; या घटनेनंतर आ. सना मलिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची संपुर्ण टीम मदतकार्यास तैनात ठेवली आहे


















