Home Uncategorized *’सिंदूर रक्तदान महायात्रा’ हा भारतीय सैनिकांसाठी रक्तदान करणारा देशातील १ला उपक्रम* –...

*’सिंदूर रक्तदान महायात्रा’ हा भारतीय सैनिकांसाठी रक्तदान करणारा देशातील १ला उपक्रम* – ना.उदय सामंत

89
0

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीहून आलेल्या ‘सिंदूर रक्तदान महायात्रे’ चा भव्य समारोप शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी ना. उदय सामंत यांनी सांगलीच्या रक्तदानवीरांची भेट घेऊन त्यांच्या नियोजनाची माहिती घेतली. ना. उदय सामंत यांनी श्रीनगर, उद्यमपूर, आर्मी कमांड हॉस्पिटल १६६ आणि एम्स रुग्णालय इथे भेट देऊन रक्तदानवीरांशी संवाद साधला.
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात व दुहेरी ‘महाराष्ट्र केसरी’ पै. चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने ही महायात्रा यशस्वी झाली. ‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ हा भारतीय सैनिकांसाठी रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम ठरला . यात एकूण १,२०० पैलवानांनी रक्तदान करून मानवतेचा आदर्श ठेवला. या उपक्रमातून शिवसेनेचे नाव जगभरात पोहोचत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. एम्स रुग्णालयातील सर्व कर्मचारीवृंदांचे विशेष आभार तसेच सर्व रक्तदानवीरांना मनःपूर्वक धन्यवाद देतो”, असे यावेळी ना. उदय सामंत यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here