*कै. कमलाबाई बाविस्कर स्मृतिदिनानिमित्त
⸻
नवी मुंबईतील उद्योजक प्रकाश बाविस्कर यांच्या मातोश्री कै. कमलाबाई भिमराव बाविस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘शिवकमल सेवा संस्था’, नवी मुंबई च्या वतीने २९ ला घोडगाव येथे मोफत नेत्र तपासणी , उपचार शिबिर व साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . ही साडी वाटपाची परंपरा सलग २० वर्षांपासून सुरु आहे.
राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान (NIA) तर्फे भारत सरकारने ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु – नेत्र चिकित्सा’ म्हणून नियुक्त केलेले डॉ. हेमंत बाविस्कर यांनी स्वतः उपस्थित राहून सेवा दिली. घोडगाव व परिसरातील ४०० हून अधिक वयोवृद्ध नागरिकांची नेत्र तपासणी करून गरजू रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिबिरानंतर कै. कमलाबाई भिमराव बाविस्कर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच डॉ. बाविस्कर व त्यांच्या चमुंंचा सत्कार करण्यात आला. बाविस्कर परिवारातील कमलाकर बाविस्कर,प्रदीप , बाविस्कर, गुणवंत , यश, तेजस , मनीषा , अनिता, विजय तसेच विजय पाटील, विनोद पाटील नितीन पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास हातभार लावला. ‘शिवकमल सेवा संस्था पुढेही समाजोपयोगी उपक्रम राबवेल’असे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी सांगितले.















