Home Uncategorized *दैनिक भास्कर चे छायाचित्रकार मच्छिंद्र नागरे यांना शिवीगाळ व धमकावले*

*दैनिक भास्कर चे छायाचित्रकार मच्छिंद्र नागरे यांना शिवीगाळ व धमकावले*

119
0

*गुंड व त्यांच्या मालका वरही कारवाई व्हावी अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष डॉ अब्दुल कदीर यांनी केली आहे.*

आज संध्याकाळी घडली ही घटना! छत्रपती संभाजी नगर येथे मिल कॉर्नर येथील हा वंचित बहुजन आघाडी चे अफसर खान. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात , नगरसेवक व सभापती , तत्पूर्वी हे सिनेमाचे तिकीट ब्लैक करून विकत होते. या नेत्याच्या हॉटेलवर पत्त्याच्या क्लब सुरू असल्याच्या कारणावरून पडलेल्या छाप्याच वार्तांकन करणाऱ्या दैनिक भास्कर चे छायाचित्रकार मच्छिंद्र नागरे यांचा मोबाईल हिसकावून घेतला. एवढेच नाही तर अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याची माहिती मिळते. सध्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया या गुंड गिरी चा जाहीर निषेध करते. या गुंडांवर कठोर कारवाई व्हावी. पत्रकार म्हणून कर्तव्य पूर्ण करताना त्यांना अडवून अभद्र व्यवहार करणे,धमकावणे यासाठी हे गुंड व त्यांच्या मालका वरही कारवाई व्हावी अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष डॉ अब्दुल कदीर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here