*प्रयोगशील नाट्यनिर्माते राहुल भंडारे सन्मानित!*
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई तर्फे दरवर्षी सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार* देऊन करण्यात येतो .
यंदा हा पुरस्कार कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रयोगशील नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांना
*राज्यपाल मा. डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .*
*राहुल भंडारे यांनी हा पुरस्कार आपल्या मातोश्री श्रीमती अंजना मधुकर भंडारे सह स्वीकारला.*
याप्रसंगी ना चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट राज्य तसेच ना. संजय शिरसाठ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, महाराष्ट्र राज्य* हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . तसेच *पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात*
उपाध्यक्ष पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई आणि *सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्वल निकम* विश्वस्त पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई हे देखील उपस्थित होते
ना. रामदास आठवले सामाजिक न्याय राज्य मंत्री, भारत सरकार* यांनी राहुल भंडारे यांचे अभिनंदन केले


















