*सोलापुर
केंद्र व राज्य शासन जन सुरक्षा अधिनियम २०२४ कायदा, केंद्रातील मोदी सरकार लोकसभेत पारित करीत आहेत. त्याविरुद्ध सर्व कामगार संघटना, कर्मचारी संघटना व विरोधी पक्षांनी दि.०९ जुलै २०२५ रोजी भारत बंद पुकारले आहे. त्याच धर्तीवर सोलापुरातील सर्व कामगार संघटना व विरोधी पक्षांनी मिळून पुकारलेल्या सोलापूर बंद आंदोलनात, सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघ जाहीर पाठिंबा देत आहे, असे पत्रक महासंघाचे विष्णू कारमपुरी (महाराज) डॉ.गोवर्धन सुंचू ,सायबन्ना तेग्गेळी, राहुल गुजर यांनी संयुक्तपणे पत्रक काढले आहे.
केंद्रातील मोदी सरकारने जन सुरक्षा कायद्या खाली कामगारांचे, कर्मचाऱ्यांचे, संघटनांचे व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणारे कायदे करून, सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आणण्याचे कुटिल प्रयत्न करीत आहे. त्यामुळे संपूर्ण देशासह सोलापुरातील गरीब विडी, यंत्रमाग व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या आणि संघटित कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम हे मोदी सरकार करत आहेत., म्हणून सोलापुरातील सर्व कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदला आमच्या महासंघाचा पाठिंबा आहे त्याचबरोबर ९ जुलै २०२५ बुधवार रोजी दुपारी १२:०० वाजता, जन सुरक्षा कायदा विरोधात आणि सोलापुरातील बिडी, यंत्रमाग व असंघटित कामगारांच्या मागण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांना महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
तरी सर्व कामगार बंधू भगिनींनी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता येथे उपस्थित रहावे., असे आवाहन महासंघाचे विष्णू कारमपुरी (महाराज), डॉ.गोवर्धन सुंचू सायबन्ना तेगेळ्ळी, आणि राहुल गुजर यांनी केले आहे.
Home Uncategorized *जन सुरक्षा अधिनियम २०२४ च्या विरोधात, विरोधी पक्षाने पुकारलेल्या संपास महासंघाचा पाठिंबा..*


















