Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग दिविजा वृद्धाश्रमात अवतरले अवघे पंढरपूर : आजी आजोबा झाले विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन

दिविजा वृद्धाश्रमात अवतरले अवघे पंढरपूर : आजी आजोबा झाले विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन

144
0

तळेरे, दि. ७ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे गावातील दिविजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर दिविजा वृद्धाश्रमात साकार केले. आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आजी आजोबांनी वारकारी वेशभूषा परिधान केली.

यावेळी आजी आजोबांनी विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानदेव, सोपान, निवृत्तीनाथ व मुक्ताई यांचा पेहराव केला तर इतर आजी आजोबांनी वारकरी पेहराव घातल्यामुळे आश्रमातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. रविवारी दिवसभर आश्रमात भक्तिमय वातावरण होते.ताशाच्या तालावर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पारंपारिक पद्धतीने पूजा अर्चा केली गेली.

आश्रमाचे खजिनदार अविनाश फाटक यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून आरती केली.

वयोमानामुळे थकलेल्या आजी आजोबांना आनंदाचे क्षण जगता यावे यासाठीमैथिली फाटक यांनी आपल्या शाळेतील (ओशिवरा माणिकजी मनपा शाळा) सेवानिवृत्त शिक्षकांना घेऊन पंढरपूर वारीचे सुंदर पथनाट्य सादर केले.

यावेळी आलेल्या पाहुण्यांमध्ये उद्योगपती श्री व सौ परिणीता उल्हास फाटक यांनी आश्रमास भेट दिली व दिंडीच्या कार्यक्रमात भाग घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी केले व त्या कार्यक्रमाचे नियोजन कु अश्विनी पटकारे, कु सायली तांबे, सौ अस्मि राणे, सौ अमृता इंदप, कु ऋतुजा इंदप, श्री समीर मिठबावकर यांनी केले तर पंढरपूरचा देखावा उभा करण्याचे काम आश्रमातील पुरुष कर्मचारी सखाराम कोकरे, श्री महादेव हुंबे, श्री सुनील इंदप, श्री प्रवीण डामरे यांनी केले. आजी आजोबांसाठी महाप्रसादाचे काम सौ मंजिरी राणे, अनुजा आचरेकर, सौ प्रतीक्षा सावंत, सौ सायली इंदप, सौ सारिका सावंत, श्रीं भारती गुरव, श्रीं प्रमिला शेलार, सौ सानिया इंदप यांनी केले.तर मुंबईहून आश्रमातील ट्रस्टी सौ साधना तेलतुंबडे,श्रीं संध्या गायकवाड,श्री संजय ढवण,श्री किरण नारायणकर,सौ अमृता थळी,सौ सुजाता हादगे,श्री पद्माकर सावे,श्री व सौ जयश्री दिनकर कांबळे,श्री व सौ वंदना विनोद जाधव,सौ सुगंधा देवरुखकर,श्रीं सुलभा पाटील,श्रीम पाखरे,श्रीम क्षमा कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here