Home Uncategorized *ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन*

*ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन*

90
0

जळगाव (प्रतिनिधी) : खान्देशातील नाट्य क्षेत्रात तब्बल पाच दशकांची वाटचाल असणारे जळगावच्या रंगभूमीवरुन व्यावसायिक रंगभूमीवर जाणाऱ्या अनेक कलावंतांना घडविणारे, सृजनशील लेखक दिग्दर्शक डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या १२ नाटकांच्या संहिताचे पुस्तकरुपाने ३ खंडात प्रकाशन आज (दि.३०) रोजी संपन्न होत आहे.
सोमवार दि.३० जून रोजी सायंकाळी ६ वाजता व.वा. वाचनालयाच्या रामनारायण अग्रवाल सभागृहात होणाऱ्या या *पुस्तकांचे प्रकाशन प्रयोगशील नाट्य निर्माते अद्वैत थिएटरचे सर्वेसर्वा राहुल भंडारे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.* या पुस्तकाचे प्रकाशन श्रेयस प्रकाशनातर्फे करण्यात येत आहे.
नाट्य या विषयावर पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी मिळविणारे व खान्देशातील रंगभूमीवर परिचित असणाऱ्या डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या मुशीतून तयार झालेले अनेक कलावंत आज व्यावसायिक नाटक, मालिका यातून भूमिका करत असून, जळगावच्या हौशी रंगमंचावरदेखील त्यांचे काही विद्यार्थी कार्यरत आहे. हेमंत कुलकर्णी यांनी आपल्या पाच दशकांच्या नाट्यप्रवासात ३५ हून अधिक नाटके तर ५० हून अधिक एकांकिकांचे लेखन केले आहे. नाट्यलेखनाव्यतिरिक्त प्रहसने, नभोनाट्ये, संशोधन पत्र, वृत्तपत्रीय लेखन केलेले आहे. यातील निवडक अशा ७ आनंदाश्रम, बातमी तशी जूनी पण, दास्ताँ, हम दो No, मुसक्या, वेग्गळं असं काहितरी, तेरे मेरे बीच में, नाना भोळे १२ शनिपेठ, पुन्हा तुर्क पुन्हा अर्क, अघटित, नेने विरुध्द शून्य, अनादी मी या १२ नाटकांचे तीन खंडात प्रकाशन होत आहे. यातील बहुतांश नाटकांनी व एकांकिकांनी महाराष्ट्रातील हौशी रंगभूमी गाजवली आहे. तरी या नाट्यसंहितांच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.हेमंत कुलकर्णी, रंगशाळा जळगाव व श्रेयस प्रकाशन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here