Home महाराष्ट्र खारावडे गावात सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत

खारावडे गावात सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत

113
0

*मुळशी तालुक्यातील खारावडे गावातील नागरिकांनी व सरपंचांनी मोठ्या उत्साहात सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत केले….!*

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार आज मुळशी तालुका दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील खारावडे गवतील नागरिकांनी श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात प्रचारसभेचे आयोजन केले होते. मोठ्या प्रमाणात परिसरातील गावच्या सरपंच यांनी सुनेत्रा पवार यांचा सत्कार करत आम्ही सर्व महायुतीच्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी सुनेत्रा पवार यांनी सर्व नागरिकांशी संवाद साधला व खारावडे परिसरातील नागरिकांना मी एकच सांगू इच्छिते की आपल्याला माहीत आहे अजितदादा आपल्या प्रत्येक अडचणीत आपल्या सोबत खंबीरपणे उभे असतात. त्याच प्रमाणे मी सुध्दा केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपली विकास कामे करण्याचा विश्वास ग्रामस्थांना सुनेत्रा पवार यांनी दिला. व महायुतीच्या उमेदवार म्हणजे मला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here