Home आरोग्य / पर्यावरण कागल शहरात 25 एकरांवर देवराई वन उभारणार! अभिनेते सयाजी शिंदे यांचा संकल्प!...

कागल शहरात 25 एकरांवर देवराई वन उभारणार! अभिनेते सयाजी शिंदे यांचा संकल्प! *छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराईत फुलणार लुप्त होत चाललेल्या एक हजार वृक्ष प्रजाती*

94
0

*कागल शहरात 25 एकरांवर देवराई वन उभारणार*

*सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा संकल्प*

*छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराईत फुलणार लुप्त होत चाललेल्या एक हजार वृक्ष प्रजाती*

*कागलमध्ये निर्माण केलेले पर्यावरणपूरक हरितपट्टे कौतुकास्पद*

*कागल, दि. २३:*
कागल नगरपालिका हद्दीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगातून २५ एकरांवर “देवराई वन” उभारणार असल्याचा संकल्प सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. सयाजी शिंदे यांनी आज कागल शहराला भेट देऊन कागलमधील विकासकामे, हरितपट्टे, नक्षत्र बागा आदींची पाहणी केली. मंत्री मुश्रीफ यांच्याशी या उपक्रमाबद्दल याआधीच आपली चर्चा झाल्याचेही ते म्हणाले.

सुरुवातीला अभिनेते सयाजी शिंदे यांनी श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव परिसरात नव्याने निर्माण होत असलेल्या “द हर्ट गार्डन” ला भेट दिली व वृक्षारोपण केले. ही बाग अगदी लहान मुलांपासून तरुण मध्यमवयीन व अगदी वयोवृद्धांच्या साठी उपयोगी पडेल. या बागेत करावयाच्या तीन हजार रोपांच्या वृक्षारोपणाचे नियोजन व वृक्षांची विविधता याबद्दल श्री. शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी श्री. शिंदे यांनी देवराई वन तयार करण्यासाठी कागल नगरपालिका हद्दीतील श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव पाणलोट क्षेत्रातील 25 एकर जमिनीची मागणी केली. तसेच; त्यांनी या जागेची पाहणीही केली. या देवराई वनात पश्चिम घाटमाथ्यावरील विलुप्त होत चाललेल्या एक हजारांवर विविध वृक्ष प्रजातींची लागवड आणि दहा वर्षे संगोपन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या देवराई वनातील पंधरा हजाराहून अधिक विविध वनस्पती येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्राणज्योती ठरतील, असेही ते म्हणाले.

या भेटीत अभिनेते श्री. शिंदे यांनी कागल शहरातील विविध विकासकामे व नाविन्यपूर्ण कामांची पाहणी केली. तसेच; हरितपट्ट्यानाही भेट देऊन वृक्ष लागवडीची माहिती घेतली. नगरपालिकेच्या या पर्यावरण पूरक उपक्रमाची त्यांनी कौतुक केले. या हरित पट्ट्यांमध्ये पश्चिम घाटमाथ्यावरील विलुप्त होत चाललेल्या वृक्ष प्रजातींची लागवड करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. पाझर तलावावरील कृत्रिम धबधबाही पाहिला. तलावातील बोटीवर स्वतः स्वार होत त्यांनी राईड केली.

श्री. शिंदे यांचे स्वागत कागल नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकारी डॉ. अजय पाटणकर यांनी केले.

यावेळी वनस्पती तज्ञ सुहास वायंगणकर, के. डी. सी. सी. बॅंकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने, प्रवीण काळबर, आर्किटेक्चर स्वप्निल संकपाळ, सौरभ पाटील, सतीश घाडगे, सुनील माळी, संजय चितारी , सुनील माळी, के. पी. पिष्टे, नवाज मुश्रीफ, सम्राट सणगर, सचिन नलवडे, लियाकत मकानदार, विजय दाभाडे, महेश चौगुले, दिग्विजय डुबल, शुभम घाटगे, बॉबी बालेखान,अल्फाज नदाफ आदी उपस्थित होते.
………….

*कागल: येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव परिसरात साकारत असलेल्या “द हार्ट गार्डन” मध्ये वृक्षारोपण करताना सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, प्रवीण काळबर व इतर प्रमुख.*
============

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here