*पहिल्या दिवशी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळावर जाऊन सुनिल तटकरेंनी केले अभिवादन…*
*राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद…*
रायगड – महाड दि. २३ मे – गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ चा सांगता समारोप छत्रपती शिवाजी महाराजांना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज केली.
गुरुवारी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या समाधीस्थळावर अभिवादन करून सांगता समारोपाची सुरुवात केली होती आणि आज सांगता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाड येथे चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन केली.
गौरवशाली महाराष्ट्राचा ६५ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंबईमध्ये तीन दिवस विविध कार्यक्रमांनी करण्यात आला होता आणि या महोत्सवाची सांगता दिनांक २२ ते २३ मे रोजी कराड आणि महाड येथे झाली.
आज सकाळी ८ वाजता प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे स्वराज्य जननी जिजाऊ यांच्या समाधीस्थळावर नतमस्तक झाल्यावर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर रायरेश्वराचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळावर वंदन केले.
दुपारी महाड येथे चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमोर नतमस्तक होऊन गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ चा सांगता केला.रात्री महाडच्या चांदे मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश प्रवक्त्या सायली दळवी, महाडच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहल जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे,नाना जगताप,धनंजय देशमुख, निलेश महाडिक, रिहान देशमुख, राकेश शहा, काका वैष्णव, मोहम्मद पल्लवकर, सौ. सोनल उतेकर, शदाब गैबी, ॲड उत्तम जाधव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

















