बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील मुख्यालयात शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर यांचा मराठी माणसाला तत्काळ.न्याय
मुंबईतील बीकेसी येथील बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयात काल शिवसेनेचे उपनेते नितीन नांदगावकर अचानक आले आणि बँकेतील एका मराठी माणसाला त्वरित न्याय तत्काळ मिळवून दिला. बँक ऑफ इंडियाचे
डेप्युटी जनरल मॅनेजर शशिराज चक्रपाणी झाकूला ह्यांनी त्यांच्यावर पूर्ण भारतातील सर्व बँकाची जबाबदारी असतानाही शिवसेनेच्या उपनेते आल्यामुळे मुंबईतील बँक ऑफ इंडियाच्या एका शाखेमधील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायबाबत लगेच दखल घेऊन प्रश्न सोडवला आणि शिवसेनेचा दणका काय असतो ते दाखवून दिले.
बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील बांद्रा रिकलमेशन येथील शाखेतील दीप भाडेकर याच्यावर त्याच शाखेतील काही सहकार्याकडून अन्याय होतं होता. लाल बावटा युनियन च्या पदाधिकाऱ्यांकडून त्याच्यावर कधी पगार काप, तर कधी अपमानास्पद वागणूक दे असा मानसिक त्रास देतं असतं. ब्रँच मधील वरिष्ठाना अनेकदा तक्रार करूनही युनियनच्या दबावामुळे ते त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असतं. अखेर श्री दीप यांनी शेवटचा पर्याय म्हणून शिवसेना उपनेते श्री नितीन नांदगावकर यांच्या शिवसेना भवन येथील जनता दरबार येथे भेटून आपली व्यथा मांडली. श्री. नांदगावकर यांनी तातडीने मराठी माणसांवर होणाऱ्या या अन्यायाच्या विरोधात थेट बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. शशिराज झाकूला यांची भेट घेऊन त्यांना सदर प्रकार सांगितला. श्री नांदगावकर प्रत्यक्ष आल्यामुळे काहीसे चक्रवलेले श्री झाकूला यांनी त्वरित श्री दीप यांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले आणि तत्काळ बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखाना तशा सूचना दिल्या . लाल बावटा युनियन आणि बँकेचे सर्व कर्मचारी या वेळी शिवसेनेच्या या दणक्याने भारावले आणि त्यानी श्री नांदगावकर यांच्यासोबत हस्तआंदोलन करून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यात मग्न झाले. शिवसेनेचा दणका काय असतो ते या निमित्ताने बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखामध्ये लगेच वाऱ्यासारखे पसरले आणि एका मराठी माणसाला पुन्हा एकदा शिवसेनेने , उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर यांनी न्याय दिला.



















