Home दिल्ली ‘जातीनिहाय जनगणना’ निर्णयाचे शिवसेनेतर्फे स्वागत! *सर्व जातींना समान संधी मिळाल्या का,...

‘जातीनिहाय जनगणना’ निर्णयाचे शिवसेनेतर्फे स्वागत! *सर्व जातींना समान संधी मिळाल्या का, हे तपासण्यासाठी ‘जातीनिहाय जनगणना’ गरजेची – डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

183
0

 

*जातीनिहाय जनगणना निर्णयाचे शिवसेनेतर्फे स्वागत; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया*

*सर्व जातींना समान संधी मिळाल्या का, हे तपासण्यासाठी जातीनिहाय जनगणना गरजेची – डॉ. नीलम गोऱ्हे*

“वेगवेगळ्या जातींना समान पद्धतीने विकासाच्या संधी मिळाल्या का, हे तपासण्यासाठी आणि विशेष संधी लाभार्थ्यांना पोहोचली का, याचे मूल्यमापन करण्यासाठी जातीनिहाय जनगणना गरजेची आहे,” असे म्हणत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.

केंद्र सरकारने नुकतीच जातीनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे शिवसेनेतर्फे मनापासून स्वागत करण्यात आले आहे. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “ही जनगणना केवळ आकडेवारीसाठी नसून, देशाच्या सर्वांगीण विकासात, प्रत्येक समाजघटकाचा सहभाग आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी आहे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी विचार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जातीसंस्थेचा विरोध लक्षात घेऊन ही प्रक्रिया राबवली तर, ती वास्तव माहितीच्या आधारे समाजहितासाठी दिशादर्शक ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

“वेगवेगळ्या जातींना समान पद्धतीने विकासाच्या संधी मिळाल्या का, हे तपासण्यासाठी आणि विशेष संधी सर्वांपर्यंत पोहोचली का, याचे मूल्यमापन करण्यासाठी जातीनिहाय जनगणना गरजेची आहे,” असे म्हणत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here