Home Uncategorized *यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली.*

*यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली.*

81
0

*राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पुढाकाराने यवतमाळमधील विविध पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.*

मुंबई, दि. 22 एप्रिल : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या विशेष पुढाकाराने यवतमाळ जिल्ह्यातील विविध राजकीय पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश सोहळा आज मुंबईतील एमसीए सभागृहात पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राध्यापक शिवाजी राठोड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद भाऊ रामटेके, बहुजन समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गार्डबैले, माजी पंचायत समिती सुरेश मेश्राम आणि बाळू भाऊ काळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या सोहळ्यात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी सर्वांचे जाहीर अभिनंदन केले. तसेच यावेळी यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढविणाऱ्या राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे विशेष कौतुक करताना येत्या काळात अजून जोमाने कार्य करीत सर्वसामान्य जनतेला न्याय देतानाच आपला राष्ट्रवादी पक्ष तळगळापर्यंत पोहचविण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला.
****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here