Home राजकीय धमकी दमबाजीला मी घाबरत नाही, उमेदवारीचा दावा सोडलेला नाही – उदय सामंत

धमकी दमबाजीला मी घाबरत नाही, उमेदवारीचा दावा सोडलेला नाही – उदय सामंत

142
0

*धमकी दमबाजीला मी घाबरत नाही, उमेदवारीचा दावा सोडलेला नाही उदय सामंत*
*घरापर्यंत पोहचाल तर माझ्याकडे सर्वांची जंत्री; उदय सामंतांचा टीकाकरांना इशारा*

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघाची जागा धनुष्यबाणाला मिळावी हा आग्रह आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

माझ्यावर वैयक्तिक टीका करु नका, घरापर्यंत पोहोचलात तर माझ्याकडे जंत्री आहे असा सज्जड इशारा उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी टीकाकरांना आज रत्नागिरी येथे माध्यमांशी बाेलताना दिला. मी तुमच्या बराेबरच काम केले आहे. मी संयमी आहे याचा अर्थ हतबल नाही असेही सामंतांनी टीकाकरांना ठणाकावले.

उदय सामंत म्हणाले काही नेते मंडळी माझ्यावर वैयक्तिक टीका करीत आहेत. मी वयाचा मान राखून काही गाेष्टी करीत असताे. माझ्यावर टीका केली म्हणून मला अजिबात राग आलेला नाही. परंतु राजकारणात काही संकेत असतात, काही संस्कार असतात. त्या लाेकांनी ते विसरले आहेत. ज्यांनी संस्कार विसरले आहेत त्यांनी त्या गाेष्टी मला सांगू नये असेही सामंतांनी स्पष्ट केले.

काेकणातील अदखलपत्र नेत्यांनी माझ्यावर टीका करु नये असे प्रत्युत्तर मंत्री सामंत यांनी वैभव नाईक यांनी किरण सामंत यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर केली. ते म्हणाले सिंधुदुर्गमध्ये माझी राणे समवेत झालेली भेट हि वैयक्तिक हाेती.

ज्यांचा पराभव निश्चित झाला आहे त्यांनी काही बोलू नये असा सल्ला सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांना दिला.

दरम्यान रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघाची जागा धनुष्यबाणाला मिळावी हा आग्रह आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here