श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये सोन्याच्या अलंकाराचा जाहीर लिलाव
श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये गुढीपाडवा या हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर ‘श्रीं’ना अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या अलंकाराचा जाहीर लिलाव मंगळवार दिनांक ०९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार असून या लिलावामध्ये हार , साखळी , कॉइन, वळ, माळ इ.असे विविध प्रकारचे अलंकार ठेवण्यात येणार आहेत. तरी सर्व भाविकांनी या लिलावामध्ये सहभाग घ्यावा.
त्याच प्रमाणे एका बाजूला श्रीसिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती व दुसर्या बाजूला ‘श्री ‘ ची प्रतिमा असलेली ११ ग्रॅम, २१ ग्रॅम, आणि ५१ ग्रॅम ९९९.९९ शुद्धता असलेली चांदीची नाणी या शुभ मुहूर्तावर विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.
#mai #mahapolitics #maimedia #media #news #news24 #marathi @shittalkardekar


















