प्रख्यात सीए सुभाष सराफ यांची ‘फ्रिमेसन’ च्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती
प्रख्यात सीए सुभाष सराफ यांची ‘फ्रिमेसन’ च्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
फ्रिमेसन ची “रिजनल ग्रँड लॉज ऑफ वेस्टर्न इंडिया” ही देशातील पश्चिम विभागाचे व्यवस्थापन करते! त्याच्या प्रमुख पदावर मुंबईतील ज्येष्ठ मेसन राईट वर्शिपफुल ब्रदर सुभाष सराफ हे पुढील तीन वर्षासाठी नियुक्त झाले आहेत* त्यांची नियुक्ती ग्रँड मास्टर मोस्ट वर्शिपफुल ब्रदर अनिश कुमार शर्मा यांनी केली.
*त्यांच्या पदग्रहणाचा समारोह नुकताच मुंबईत संपन्न झाला*
” फ़्री मेसनने आजपर्यत आपल्या लोकोपयोगी कामाची कधी जाहिरात केलेली नाही. समाजाहितासाठी असणाऱ्या आमच्या अनेक ॲक्टिव्हिटी आहेत. तेव्हा समाजहितासाठी काम करावं आणि त्यासाठी फ्री मेसनना एकत्र आणणे हा माझा प्रयत्न राहील” अशी भावना सुभाष सराफ यांनी व्यक्त केली !
फ्री मेसन ही विश्व बंधु भाव आणि आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी काहीतरी करण्यासाठी तत्पर असणारी संस्था आहे .
त्यातील एक भाग म्हणजे असे काही आजार मानव जातील भेडसावणारे आहेत, त्यातील **थालासेमिया** या आजाराकरिता देशातील सर्व फ्रीमेसन तर्फे एक प्रोजेक्ट हाती घेतला आहे.
**थालासेमिया** हा लहान वयात होणारा आजार आहे आणि त्यावर काही उपाय नाही. यात लहान मुलांच्या अंगात रक्त रहात नाही आणि दर १५/२०दिवसांनी त्यांना रक्त द्यावं लागतं .त्या बाबत जनजागृती करणे हा आमचा नवीन प्रोजेक्ट आहे! अशीही माहिती त्यांनी दिली
“थालसेमिया मेजर ” हा व्याधीग्रस्त बालकाचा उपचार न केल्यास बालकाचा मृत्यू अटळ असतो!
थालसेमिया या व्याधीबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी आणि योग्य उपचारासाठी; विविध संस्थांच्या सहकार्याने, जनजागृती करण्यासाठी फ्री मेसन संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी प्रकल्प राबवणे हे ध्येय सुभाष सराफ यांचे आहे!



















