Home पत्रकारवार्ता - माई *सच्ची पत्रकारिता फाटकी वस्त्र व साखळदंडात* *मंत्रालयासमोर उभी आहे!*

*सच्ची पत्रकारिता फाटकी वस्त्र व साखळदंडात* *मंत्रालयासमोर उभी आहे!*

164
0

*फडणवीस सरकार*
*आपल्याला कुणी अधिकार दिला असे अपमानित करण्याचा?*

*पत्रकार महामंडळाचे काय करता ते सांगा*

सरकारने ना एकनाथ शिंदेंच्या योजनांचा निधी थांबवला वगैरे जोरात बातम्या चँनल्सवर जोरदार वाजतात!
*पण पत्रकार महामंडळाच़ं काय झालं हे सगळे पत्रकार का विचारत नाहीत?*
(हे महामंडळ पत्रकारेतर कर्मचार, मालक सगळ्याच्या हिताचं आहे.)

*१००तोफांची सलामी अशा पत्रकारितेला, जी आपल्या व आपल्या पत्रकार जमातीसाठी बोलत नाही, लिहित नाही!*
आपण शेखचिल्ली आहोत, *डोळ्यावर झापडं आणि कधीही पडणार आपल्या झाडाची लाकडं!*
अशी आपली गत!*
*अशामुळे च आपण आज असुरक्षित जगतोय!*

*ट्रिपल इंजिन सरकारमधे श्रेयवादाची लढाई सुरु आहे..*
* *हे असं आघाडी युतीचं सरकार असलं तर चालतच रहाणार, या बातम्या ही खूप वाजणार!*
*पण महाराष्ट्रातल्या पत्रकार क्षेत्राची जी काही अवस्था आहे ती फारशी चांगली नाही.*
*अधिस्वीकृती समिती संबंधित व इतर चुकीच्या घटनांबद्दल ज्येष्ठ व्यंगचित्र पत्रकार प्रशांत अष्टिकर यांनी खूपशा गंभीर बाबी समोर आणल्यात (अजुनही असतील त्या आणतील), हे सगळ्यांना माहिती आहे.*
किती व कोणत्या संघटना बाद आहेत?तरिही त्यांचे सदस्य व त्या संघटना अधिस्वीकृती व शंकरराव चव्हाण समितीत कशा? याबाबत अनेकदा निवेदन देऊन जर सरकार दरबारी कारवाई व कार्यवाही होत नसेल तर हा महाराष्ट्रातील समस्त माध्यमकर्मीवर होणारा अन्याय आहे.
*कोणत्याही विषयाचं राजकारणं न करता विचारपूर्वक काम केलं तर त्याचे फलित चांगले असते!*
*आणि म्हणूनच हा विषय सतत मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो.*

*सच्चा पत्रकारितेला मदत झाली पाहिजे.*

*७महिने झाले,पत्रकार महामंडळ करतेय आपले सरकार? आणि तसे लेखी निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांनी दिले.*
*मिटिंग घ्या,अहवाल द्या असे माहिती व जनसंपर्क च्या प्रधान सचिवांना दिले*. *मंत्री *मंडळात चार ओळीचा ठराव मंजुर झाला!*
*मग तो कुठे गेला काय झालं त्याचं?* *कामगार विभाग काय करतय?*
*तो रद्द केला का? केला असेल तर का केला?*
*खरं तर हे काम माहिती व जनसंपर्क आणि कामगार विभागाने मिळून करायला हवे!*
*यासाठी कामगार आयुक्तालयातील माजी सहायक आयुक्त बुवासाहेब यांचे नावंही आम्ही दिले, १०दिवसात महामंडळ तयार होऊ शकते असे त्यांनी सांगितले!*
*पण मुख्यमंत्री पदी ना एकनाथ शिंदे असतानाच हे महामंडळ झाले असते,पण निर्देशाचं काय झालं याची माहिती का दिली गेली नाही?*
* *ना एकनाथ शिंदेंनी लढाऊ बहिणीला विचारपूर्वक दिलेला शब्द , का व कुणी बासनात गुंडाळला?*
* *महामंडळामुळे या क्षेत्रातील सर्व माध्यमकर्मींना एक भक्कम सुरक्षा कवच व मीडियाकर्मी म्हणून ओळख व सन्मान मिळणार आहे!*

*या परिसस्पर्शी योजनेला कुणाचा आणि का खोडा आहे हे समोर आले पाहिजे!*
*या महामंडळाबाबत नसेल करायचं काहीच तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने तसे सांगून टाकावं!*
*म्हणजे मी आमरण उपोषण करुन खुळेपणा केला असं समजून निवांत होईन;*
*आणि हो माझ्या जीवाच्या चिंतेने आणि विषय समजून घेऊन माझे बंधू ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी ही वेडेपणा केला; मंत्रीमंडळाने कोणताही विचार न करता मंजुरी दिली असे इतिहासात अधोरेखित करता येईल!*
*लिहिणे आवश्यक वाटले म्हणून लिहिले.*
🙏🙏🙏
*सध्या ‘लाडकी बहिण’ या बिरुदापासून वंचित असलेली*

*शीतल हरीष करदेकर*
संस्थापक अध्यक्ष
*मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here