Home Uncategorized *अंजलीताई दमानिया यांनी आज इफकोची खते मिळाली नसल्याबाबत आणि ती मिळू देत...

*अंजलीताई दमानिया यांनी आज इफकोची खते मिळाली नसल्याबाबत आणि ती मिळू देत नसल्याबद्दल केलेल्या खोट्या आरोपांची वस्तुस्थिती*

97
0

▶️जागतिक स्तरावर सर्वात मोठी खतांची सहकारी संस्था IFFCO ने याआधीच लेखी स्वरूपात स्पष्ट केलेले आहे की कोणत्याही ई – कॉमर्स प्लॅटफॉर्मला IFFCO ची उत्पादने विकण्याचा अधिकार नाही.

▶️अनधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून खरेदी करण्यात येणारी IFFCO ची उत्पादने ही संपूर्णतः खरेदीदारांच्या जबाबदारीवर आहेत. सदर प्लॅटफॉर्म गैरवाजवी किंमतीत ही उत्पादने अनधिकृतरित्या विकतात.

▶️ ऑनलाईन खतविक्री बाबतच्या केंद्र सरकारच्या नियमानुसार एफसीओ परवाना किंवा IFFCO कडून अनिवार्य असलेला ओ फॉर्म नसलेल्या कोणत्याही संस्थेस उत्पादने विक्री करण्यास मनाई घातलेली असून असे केल्यास त्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार IFFCO ने राखून ठेवलेला आहे.

▶️ याबाबत IFFCO ने वेळोवेळी प्रेस नोट काढून माध्यमांना देखील माहिती दिलेली आहे.

▶️IFFCO कंपनीच्या सर्व उत्पादनांची विक्री किंमत ही संपूर्ण देशात सारखीच आहे. मात्र काही कमर्शिअल ई – कॉमर्स प्लॅटफॉर्म या खतांच्या दहा – पाच बाटल्या कुठूनतरी उपलब्ध करून त्या ऑनलाईन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिकचे डिस्काउंट देऊन विक्रीस ठेवतात. अशी माहिती समोर आल्यानंतर IFFCO ने संबंधितांना नोटिसा सुद्धा दिलेल्या आहेत.

▶️अंजलीताई दमानिया यांनी आज सांगितलेल्या ऍग्री बीग्री या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला IFFCO ची उत्पादने विकण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे वादात येण्यापेक्षा संबंधित कंपनीने सदर उत्पादनांची ऑनलाईन विक्री बंद केली असावी.

▶️कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अशी विक्री बंद होत नसते, ही साधी खोटे आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवी.

▶️ म्हणूनच अर्धवट ज्ञान नेहमी धोक्याचे असते, चांगल्या माणसाला तोंडावर पाडते!

▶️ सोबत इफको कंपनीच्या काही यासंबंधीच्या प्रेसनोट, नोटीस आणि बातम्या ची कात्रणे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here