*ईमारती मधील रहिवासी रोज जीव मुठीत धरून राहत आहेत*
सायन प्रतीक्षा नगर येथील बहुमजली ईमारत क्रमांक १४ ही म्हाडा मुंबई मंडळाकडून सोडत द्वारे सन २००५ रोजी विकण्यात आली,सदर ईमारत ही म्हाडाच्या १३,१२,१५ ह्या संक्रमण शिबिरातील ईमारतिच्या बरोबर मधोमध आहे,म्हाडाने सदर ईमारत ही नियमानुसार न बांधल्यामुळे ही मधील रहिवासी रोज गेली कित्येक वर्षं जीव मुठीत धरून राहत आहेत.
सदर इमारतीच्या बरोबर सोमरच संक्रमण शिबिरातील ईमारत क्रमांक १३ची मागील बाजू असल्याने १३ मधील रहिवासी रोज काही ना काही वस्तू उदा.दारूच्या बाटल्या,क्रिकेट बॅट, टुबलाईट ,लोखंडी रॉड,घरातील भांडी सतत खाली टाकत असतात,तसेच घरातून थुकने,कचरा फेकणे हे सतत चालू असते,वांरवार धोकादायक वस्तू ई १४ मधील रहिवासी वर्गाच्या डोक्यात पडून कित्येक वेळा अपघात झाला आहे,त्यामुळे सदर ईमारती मधील सर्व रहिवासी वर्गाने स्थानिक शिवसेना माजी नगरसेवक श्री.रामदास कांबळे, उपविभाग प्रमुख श्री.प्रभाकर भोगले,शाखाप्रमुख श्री संजय म्हात्रे यांना ईमारती जवळ बोलवून पाहणी केली आणि म्हाडा मुंबई मंडळाचे अधिकारी श्री.गावित यांच्या दालनात बैठक सर्व परिस्थिती सांगण्यात आली,श्री गावित यांनी ईमारत क्रमांक १४ समोर पत्र्याची शेड टाकून देण्यासाठी आश्वासन दिले आहे.
इमारतीचे सचिव श्री दर्शना भोसले यांनी सांगितले जर म्हाडा कडून आम्हाला सहकार्य झाले नाही तर आम्ही उद्या काहीही अघटीत घटना घडली तर म्हाडा अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत.

















