श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिरात माघ शुध्द प्रतिपदा ते माघ शुध्द सप्तमी (दि. ३०जानेवारी, २०२५ ते ०४ फेब्रुवारी, २०२५) या होणाऱ्या माघी उत्सवाच्या उपरोक्त विषयाच्या
अनुषंगाने मंगळवार, दि. २८ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता, श्रीसिध्दिविनायक
गणपती मंदिर, पहिला मजला, प्रतिक्षालय इमारत येथे पत्रकार परिषद (Press Conferance)
आयोजित करण्यात आली होती.
9यावेळी न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी,
विश्वस्त सर्वश्री. भास्कर शेट्टी, मनीषा तुपे,भास्कर विचारे, राहूल लोंढे,
महेश मुदलीयार,जितेंद्र राऊत, सुदर्शन सांगळे हे उपस्थित होते.
सदर पत्रकार परिषदेत माघ गणेशोत्सवात आयोजित विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांबाबतची माहिती देण्यात आली. त्याबाबतची कार्यक्रम पत्रिका सोबत जोडली आहे.
यासंबंधीची थोडक्यात रूपरेषा पुढीलप्रमाणे
—
दि. ३० जानेवारी, २०२५ पद्मश्री शंकर महादेवन यांचे गायन
→ पद्मश्री शिवमणी यांचे ड्रमवादन
दि. ०१ फेब्रुवारी, २०२५
रथशोभायात्रा मार्ग
दि. ०४ फेब्रुवारी, २०२५
श्रीगणेश जन्म रोजी सिध्देश मणेरीकर यांचे कीर्तन
दुपारी ०४:०० वा. रथशोभायात्रा
श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर एस. के. बोले मार्ग
( आगर बाजार ) (हनुमान मंदिर) ते गोखले मार्ग
( दक्षिण ), पोर्तुगिज चर्च, ( शंकर मंदिर )
दादर पोलीस स्टेशन, जाखादेवी चौक, सयानी रोड,
(खेडगल्ली) ( विठ्ठल रुक्मीणी मंदिर), सयानी रोड
मार्ग, शंकर घाणेकर मार्ग, अप्पासाहेब मराठे मार्ग,
प्रभादेवी मंदिर, नवीन प्रभादेवी मार्ग ते
प्रभादेवी मंदिराच्या बाजूने परत वीर सावरकर मार्ग
ते श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर.
हवन करुन पूर्णाहूतीने सांगता.
या कालावधीत दररोज “श्रीं” चे सामुहिक नामस्मरण केले जाणार.
तसेच यावेळी श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समिती यांनी
खालीलप्रमाणे घेतलेल्या निर्णयांबाबत भाविकांना सूचना देण्यात येईल.
■श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिरात “श्रीं” च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शालिनता जपणारे व मंदिराचे पावित्र्य राखले जाईल असे कपडे परिधान करून दर्शनासाठी यावे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तोकडे कपडे घालून आल्यास त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
असात्विक वेशभूषा जैसे कटी फटी जीन्स, स्कर्ट एवं अंगप्रदर्शक उत्तेजक, असभ्य,
अशोभनीय वस्त्र पहनकर प्रवेश न करें।
भारतीय संस्कृति का पालन हो सके ऐंसे वेशभूषा मे ही दर्शन करे । इन नियमो का पालन करके कृपया सहयोग करे ।
■ महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिकमुक्त धोरणाच्या अनुषंगाने श्रीसिध्दिविनायक गणपती
मंदिर न्यासाकडून श्रीसिध्दिविनायक मंदिरातील प्रसादासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक
पाऊच बंद करुन, पर्यावरणपूरक कागदी पाऊचचा वापर प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पत्रकार परिषदेत शीतल करदेकर यांनी मंदिरातील पुजा-यांच्या वेशभूषेबाबत प्रश्न उपस्थित केला. धोतरासह वरील अंग झाकणारे कपडे पुजा-यांनाही असायला हवेत ,जेणे करून भक्तांसह देवाचे नजीकचे भक्त अर्थात सेवेकरी पुजारी हे उघडे न राहता शालीन अंगभर वस्त्रात दिसतील तर उत्तम!
त्यांना उघडे पाहण्याचा अत्याचार महिला भक्तांनी का सोसावा?
संपूर्ण जग पूजेचे थेट प्रक्षेपण पाहते. शालीनता या सेवकांनी ही पाळावी…
तसेच पुजारी भक्तांना प्रसाद देतात ते पेढे लाडू हायजेनिक असावेत. ही काळजी घ्यायला हवी.
यावर या सूचनेचा नक्की विचार करू असे विश्वस्तांनी सांगितले.
मंदिरात माघी उत्सवाच्या पाहिल्याचं दिवशी पुजारी व ब्रम्हवृंद अंगभर शालीन वस्त्रात दिसले.
ही शालीनता कायम राखली जावी अशी भाविकांची मागणी आहे


















