महाराष्ट्राची ३४,६१० कोटी विदेशी गुंतवणूकीने देशात आघाडी
*२०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत FDI मध्ये देशात महाराष्ट्र पुन्हा अव्वल*

महाराष्ट्रातून गुंतवणूकदार बाहेर जात आहेत, रोजगार कमी होताहेत असा ओरडा सुरू असताना उद्योगमंत्री ना उदय सामंत यांनी महाराष्ट्राला देशात अव्वल बनवण्याची कामगिरी केली आहे.
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT), भारत सरकार, ने ऑक्टो-डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) अहवाल जारी केला , या तिमाहीत *महाराष्ट्राने ३४,६१० कोटी विदेशी गुंतवणूक मध्ये आघाडी घेतली,* २९,५२६ कोटी रुपयांसह गुजरात दुसऱ्या स्थानावर तर ६,७५९ कोटी रुपयांसह कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत एकूण एफडीआय महाराष्ट्रासाठी रु.१,००,११२ कोटी, गुजरात रु. ४८,४१० कोटी, दिल्ली रु. ३१,१६१ कोटी, कर्नाटक रु.३०,२१९ कोटी आहे.m
दावोस जागतिक आर्थिक परिषद २०२४ मध्ये महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली असून यावर्षी तीन लाख 233 कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योग विभागाच्या अधिनस्थ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाप्रीतमार्फत ७२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थितीत झाले
या करारामुळे महाराष्ट्रात जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहेत! महाराष्ट्रात उद्योगासाठी पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ असून एक इकोसिस्टीम आहे !
जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान , हरित हायड्रोजन ,हरित ऊर्जा, पेपर आणि पल्प, खार उद्योग, डेटा सेंटर ,इंफ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे .

अमेरिका स्विझरलँड सिंगापूर दक्षिण कोरिया या देशाने सामंजस्य करारावथ सह्या केल्या असून या देशानी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे . आर्सेअर मित्तल, जिंदाल ,गोदरेज या कंपन्यानी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे


















