Home मुंबई रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशची शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक! केंद्रीय राज्यमंत्री रामदास...

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशची शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार

186
0

मुंबई दि १७ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) या पक्षाची महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी ची उद्या महत्त्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक १८ जानेवरी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या आणि राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारणीची ही बैठक महत्वपूर्ण ठरली आहे .
या बैठकीत राज्यभर राबविण्यात आलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात येणार आहे रिपब्लिकन पक्षाच्या पुढील वाटचाली बाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या पदाधिकारी जिल्हाध्यक्षांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम ,सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले आहे या बैठकीत केवळ महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनाच बैठकीत निमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षातर्फे देण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here