Home पुणे सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमी गौरव पुरस्कार

सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमी गौरव पुरस्कार

175
0

बालरंगभूमी संमेलन सन्मान समारोप सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे बालरंगभूमी परिषदेचे बालरंगभूमी संमेलन बालकलाकारांच्या जल्लोषपूर्ण सादरीकरणाने रंगले.
संमेलनाच्या तिस-या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता संपन्न झालेल्या पुरस्कार सन्मान व समारोप सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत बालरंगभूमीवरील अतुलनीय कार्य केल्याबद्दल रंगकर्मी प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


या पुरस्कार सन्मान सोहळ्याला संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर, डॉ.मोहन आगाशे, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, गंगाराम गवाणकर, शैलेश दातार, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, गणेश मतकरी, सुप्रिया मतकरी आदी मान्यवरांसह बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के-सामंत, कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, दीपा क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ अन्सारी शेख, कार्यकारिणी सदस्य धनंजय जोशी, दीपक रेगे, अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, योगेश शुक्ल, आनंद जाधव, त्र्यंबक वडसकर, नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.
या सन्मानसोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमीवरील कार्यासाठी बालरंगभूमी गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी सन्मानाला उत्तर देतांना,
प्रतिभा मतकरी यांनी सांगितले की, “बालरंगभूमी ही नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. बालरंगभूमी यशस्वी होण्यासाठी मी सदोदित प्रयत्न केले. बालरंगभूमी परिषदेने माझ्या कार्याची दखल घेऊन, हा सन्मान मला दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून आता बालरंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी खंबीर पाठबळ मिळाले आहे. त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा.”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here