Home मुंबई संतापजनक घटना: पोलिसी दडपशाहीचा निषेध

संतापजनक घटना: पोलिसी दडपशाहीचा निषेध

135
0

“शिवस्मारक फक्त दिखावा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान!”

आज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी आवाज उठवणाऱ्या आंदोलनावर सरकारच्या आदेशाने पोलिसांनी बळाचा अत्यंत भयानक वापर केला. आंदोलन करत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले आणि इतर शिवभक्तांना पोलिसांनी तोंड दाबून, मारहाण करून, पोलिस व्हॅनमध्ये कोंबले आणि जबरदस्तीने ताब्यात घेतले.

शिवरायांच्या नावाने जलपूजनाचा दिखाऊ सोहळा करून, आठ वर्षे स्मारकाचे काम थांबवणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अपमान आहे. आजचे हे आंदोलन या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी होते, पण सरकारने पोलिसांच्या हाताने दडपशाही करून लोकशाहीची गळचेपी केली आहे.

शिवरायांची कृतीशील विचारधारा विसरणाऱ्या केंद्र सरकारच्या ढोंगी शिवभक्तीचा आम्ही निषेध करतो. पोलीस दडपशाही, मारहाण आणि आंदोलकांचा अवमान हा लोकशाहीतील काळा दिवस आहे. मात्र, आम्ही सरकारच्या या दडपशाहीला भीक घालणार नाही.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिवस्मारकासाठी लढा उभारला आहे आणि तो अखेरपर्यंत चालू राहील. महाराष्ट्रातील जनता आता उठेल आणि सरकारला उत्तर देईल!

#शिवस्मारक_कधी?
#शिवरायांचा_अपमान_सहन_होणार_नाही
#दडपशाहीचा_निषेध
#लोकशाहीची_गळचेपी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here