Home पुणे बालरंगभूमी परिषदेचे अविस्मरणीय असे१ले बालरंगभूमी संमेलन !

बालरंगभूमी परिषदेचे अविस्मरणीय असे१ले बालरंगभूमी संमेलन !

152
0

अखिल भारतीय मराठी नाटय परिषद संलग्न असलेली संस्था बालरंगभूमी परिषद च्या बालकलाकारांसाठी उचलले ” शिवधनुष्य ” निलमताई शिर्के – सामंतनी…..! *बालरंगभूमी परिषदच्या अध्यक्षा निलमताई शिर्के – सामंत यांच्या मार्गदर्शनात पहिले बालरंगभूमी संमेलन नुकतेच पुण्यात संपन्न झाले.

पहिल्या दिवशी अनेक बालकलाकारांनी नाट्यदिंडीचा भरपूर आनंद घेतला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक , नाट्यगृह ,पुणे येथे बालरंगभूमी परिषदेचे १ले बालरंगभूमी संमेलन आयोजित करण्यात आले होते.


बालकलाकारांच्या जल्लोषपूर्ण सादरीकरणाने संपुष्ट संमेलनात रंगत आणली!


संमेलनाचे ३ही दिवस न भूतो भविष्यती असे होते .
दिग्गज कलाकारांनी या संमेलनास आवर्जुन उपस्थिती लावून या बाल कलावंतांना प्रोत्साहन दिले.

 

बालरंगभूमी संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी संपन्न झालेल्या पुरस्कार सन्मान व समारोप सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत बालरंगभूमीवरील अतुलनीय कार्याबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी प्रतिभा मतकरी यांना ‘बालरंगभूमी गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सन्मान सोहळ्याला संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर, डॉ.मोहन आगाशे, सयाजी शिंदे, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये,नाटककार गंगाराम गवाणकर, शैलेश दातार, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, गणेश मतकरी, सुप्रिया मतकरी ,डाॅ प्रदीप ढवळ आदी मान्यवरांसह बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के-सामंत, बालरंगभूमी परिषद उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, दीपा क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ अन्सारी शेख, कार्यकारिणी सदस्य धनंजय जोशी, दीपक रेगे, अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, योगेश शुक्ल, आनंद जाधव, त्र्यंबक वडसकर, नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.
.
या सन्मान सोहळ्यात लहान मुलांमुलींसाठी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पद्मश्री उदय देशपांडे, चित्रकथी परंपरा जपल्याबद्दल पद्मश्री परशुराम गंगावणे, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, संगीतकार सलील कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यासह भार्गव जगताप, खुशी हजारे, आरुष बेडेकर, मायरा वायकुळ, माऊली व शौर्य घोरपडे, स्वरा जोशी या बालकलाकारांनाही ‘विशेष बालकलाकार गौरव पुरस्कारा’ने सन्मानीत करण्यात आले. सन्मान सोहळ्यादरम्यान निलेश गोपनारायण यांच्या चिंची चेटकणीसह सिनेनाट्य बाल युवा कलाकारांनी केलेल्या बहारदार सादरीकरणाने बालक व पालक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
सन्मान व समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन दिप्ती भागवत यांनी तर आभार बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष दीपा क्षीरसागर यांनी मानले.
दरम्यान, आज बालरंगभूमी संमेलनाच्या समारोपाच्या तिस-या दिवशी सकाळच्या सत्रात बालरंगभूमी परिषदेच्या सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, परभणी, नागपूर, धुळे, कल्याण, बीड, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे या शाखेच्या बालकलावंत व दिव्यांग कलावंतांनी संमेलनांच्या ‘सुधा करमरकर’ मुख्य रंगमंच व ‘सुलभा देशपांडे मुक्त मंचा’ वर सादरीकरण केले. सादरीकरणानंतर या शाखांतील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
दुपारच्या सत्रात ” मला काही बोलायचंय ” या बालक, पालक, शिक्षक आणि बालरंगभूमी परिषद प्रतिनिधींच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात अभ्यास महत्वाचा, पालकांच्या अपेक्षा आणि मुले, वाचनसंस्कृती, बालपण हरवलं आहे का, मातृभाषा संवर्धन, मोबाईल चांगला की वाईट, शाळेतील शिक्षा, बालनाट्य कसे असावे, होमवर्कचं टेन्शन, मुले हुशार की मुली हुशार,संवाद लुप्त होतो आहे का ? या विषयांवर मुलामुलींचे, पालक, शिक्षक यांच्याशी बालरंगभूमी परिषदेच्या पदाधिका-यांनी संवाद साधला. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अध्यक्ष अॅड.निलम शिर्के सामंत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here