रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे दुबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज मास्टर व्हिजन इंटरनॅशनल एक्सलंस ॲवॉर्ड चे वितरण विविध मान्यवरांना करण्यात आले.यावेळी सामाजिक ; चित्रपट आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांना ना.रामदास आठवले यांच्या हस्ते मास्टर व्हिजन ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला.या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दुबईतील उद्योजक मोहम्मद रफिक यांनी केले होते.यावेळी एलाईट ग्रुप चे प्रमुख उद्योजक हरिकुमार; के जी एफ सिनेमातील दाक्षिणात्य अभिनेता रामचंद्र राजू गरुडा राम ; डॉ तोसिफ पाशा यां सह अनेक मान्यवर उपस्थित होते.



















