Home मनोरंजन ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’! मनोरंजन व सह्याद्री देवराई स्टार सयाजी शिंदे सांस्कृतिक व...

‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’! मनोरंजन व सह्याद्री देवराई स्टार सयाजी शिंदे सांस्कृतिक व वनमंत्री बनावेत* (शीतल करदेकर)

226
0

*मनोरंजन व सह्याद्री देवराई स्टार सयाजी शिंदे सांस्कृतिक व वनमंत्री बनावेत*
(शीतल करदेकर)

*अभिनेता व सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे सांस्कृतिक व वने मंत्री झाले तर प्रचंड चांगलं काम होऊ शकते.*

 

महाराष्ट्रालाही एक कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांची एक उत्तम परंपरा आहे. पण दक्षिणेसारखे कलाकार राजकीय सुपरस्टार अद्याप बनले नाहीत.
राजकारण्यांचे एक घासून पुसून लख्ख केलेले वाक्य आहे. ‘ प्रत्येक राजकीय नेता हा उत्तम कलाकार असतो.”
नरगिस,सुनिल दत्त यांनी केलेले समाजकार्य सर्वज्ञात आहे…इतर कलावंतही सांगता येतील.


*प्रचार प्रसार आणि सर्व ठिकाणी लोकांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांना कलाकार लागतात. पण दक्षिणेसारखं राजकीय मानाचा पान देण्याचे काम महाराष्ट्रात झालं नाही.*
*अभिनेता सयाजी शिंदे हे मराठी नाटकांपासून ते मराठी हिंदी सिनेमा त आपला ठसा उमटवलेलं नावं.*
*दक्षिणात्य चित्रपटातील त्यांचे काम तर खूप मोठे. त्यांनी मराठी कलाकारांना दक्षिणात्य चित्रपटाचा मार्ग सुरु करुन दिला असं निश्चित म्हणता येईल.


*कलाकार म्हणून ग्रेट आणि माणूस म्हणूनही ग्रेट!*
*पत्रकारांसाठी महामंडळाच्या मागणीसाठीचं आमरण उपोषण आझाद मैदानावर मी आमच्या मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने सुरु केलं*,तेव्हा *आम्हाला पाठिंबा देणारा आणि महामंडळाची मागणी योग्य आहे म्हणून मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , व उपमुख्यमंत्र्यांकडे व्हिडिओद्वारे मागणी करणारा हा पहिला आमचा भाऊ सयाजी शिंदे होता.*
*माणूसपण जपणारा आणि मदत करणारा ‘सयादादा’ अजितदादा पवारांच्या पक्षात प्रवेशकर्ता झाला, हा आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.*


*पण केवळ प्रचारक म्हणून या अशा मोठ्या कर्तृत्ववान कलाकारांकडे न पाहता त्यांच्याकडे मंत्री म्हणून जबाबदारी दिली तर खूप काही उत्तम होऊ शकते…*
*हे यासाठी सर्वासमोर आणतोय कारण सयादादा ने केलेले वृक्ष सेवेचे काम!*
*झपाटून जाऊन झाडे लावणारा,महाराष्ट्रात नक्की कोणती झाडे लावली तर पर्यावरण संरक्षण होईल याचा अभ्यास त्यांना आहे.*
*झाडांसाठी वृक्ष संमेलन,* *वृक्षतुला,झाडे वाचवणे,मंदिरात प्रसाद म्हणून झाडाची रोपही*
*देणे अशा जबरदस्त कल्पना स्वतः च त्याचा ब्रैंड एम्बेसेडर म्हणून राबताना त्यांना सगळ्यांनी पाहिलय*
*आपला हा कामाचा मोठा वृक्ष त्यांनी देशात जिथे पोहचवता येईल तिथे पोहोचवलाय!*


*सांस्कृतिक क्षेत्राचे ज्ञान भान आणि जाण असणारा ‘सयादादा’ मराठी मनोरंजन क्षेत्राचे हित आणि विकासाचं काम तळमळीने करु शकतात याची जाण त्यांना जे ओळखतात त्यांना आहे.*

*लिहिण्यासारखं खूप आहे. राजकारण हे सयादादां चे उपजिविकेचे साधन नाही;त्यामुळे इथे आर्थिक फावड़ा मारण्याची त्यांना गरज नाही.*
*मनोरंजन, सांस्कृतिक,वने कल्याण यासाठी सयाजी शिंदे हे नावं फुल फिट आहे.*


*उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा संवेदनशीलपणे विचार करतील तर महाराष्ट्राला सयाजी शिंदेंच्या रुपाने एक उत्तम मंत्री मिळेल!*
*सयाजी शिंदे हे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या साता-यातले.*
*असा चांगला स्टार नेता मंत्रीपदी येण्यास एकनाथ शिंदेनाही निश्चित आवडेल !*
*दूूरदृृष्टी असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा विचार नक्की करतील.*त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री म्हणून मानाचं पान सयाजी शिंदे यांना देण्यास नकार देणारच नाहीत.*झटपट निर्णय घेण्यात ते एक्सपर्ट आहेत.*
*महाराष्ट्राच्या हितासाठी कळकळीनं लिहावं असं वाटलं…म्हणून हा लेखनप्रपंच!*
*मोठे साहेब अर्थात खा। शरद पवार साहेब जसे माणसं ओळखून जबाबदारी देतात* *तसेच काम उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी करायचय!*
*सयाजी शिंदे..हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे!त्यांना अचुक कोंदणाची गरज आहे.*
*तेव्हा एकूण त्यांच्या कामाचा,अनुभवाचा विचार करता…अजितदादा,एकनाथभाई आणि देवाभाऊ यांनी* *’सांस्कृतिक व सह्याद्री देेवराई स्टार’ सयाजी शिंदे यांची सांस्कृतिक व वने मंत्री पदाचं कोॅदण द्यावं ही आम्हा समस्त पत्रकारांची मागणी आहे.*
*****
*शीतल करदेकर*
7021616645

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here