Home पुणे मंत्र्यांचा शपथविधी रविवारी नागपुर राजभवनात होण्याची दाट शक्यता !

मंत्र्यांचा शपथविधी रविवारी नागपुर राजभवनात होण्याची दाट शक्यता !

171
0

मंत्र्यांचा शपथविधी रविवारी नागपुर राजभवनात होण्याची दाट शक्यता

रविवार पासून मंगळवार पर्यंत  मा राज्यपाल नागपुरात आहेत. दि १९ डिसेंबरचा त्यांचा नागपूरातील कार्यक्रम रद्द झाल्याचे समजते. म्हणजे ते आता १५,१६ आणि १७ तारखेला नागपुरात आहेत

ते रविवारी सकाळी किती वाजता नागपूरला पोहोचतील याचा कार्यक्रम अजून निश्चित झालेला नाही, तो उद्या शनिवारी सकाळी निश्चित होईल. १९ तारखेचा त्यांचा नागपूरातील कार्यक्रम रद्द झाला आहे. म्हणजे ते आता १५,१६ आणि १७ तारखेला नागपुरात आहे.

नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी रॅली रविवारी सकाळी ११ वाजता निघणार आहे. ही रॅली साधारणतः ३ तास चालण्याची शक्यता असल्याचे  समजते.

हे सगळे पाहाता रविवारी सायंकाळी ४ वाजता नागपूर राजभवन येथे मंत्रीमंडळातील शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here