Home Uncategorized मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील राज्यातील पहिल्या वातानुकुलीत...

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील राज्यातील पहिल्या वातानुकुलीत चालक- वाहक विश्रांतीगृहाचे उद्घाटन संपन्न

121
0

मुंबई

मुंबई सेंट्रल येथील राज्यातील पहिल्या वातानुकूलित चालक – वाहक विश्रांती गृहाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर व एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या निधी द्वारे राज्यातील वेगवेगळ्या आगारातून बसेस घेऊन येणाऱ्या सुमारे ३०० चालक- वाहकांसाठी तसेच मुंबई आगारातील १०० चालका – वाहकांच्यासाठी सुमारे ९० लाख रुपये खर्चून वातानुकुलीत असे ३ अत्याधुनिक विश्रांती कक्ष बांधण्यात आले असून, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या विश्रांती कक्षांमध्ये टू टिअर बॅक बेड सह, करमणूक कक्ष, जेवणासाठी स्वतंत्र हॉल , स्वच्छ व टापटीप असे प्रसाधनगृहे निर्माण करण्यात आली आहेत.
अशाच प्रकारचे वातानुकूलित विश्रांती कक्ष परळ, कुर्ला नेहरूनगर ,बोरवली नॅन्सी कॉलनी येथील आगारात तयार करण्यात येणार असून ठाण्यातील खोपट बस स्थानका वर दुसरे वातानुकूलित कक्ष बांधून तयार झाले आहे. त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे.

जनसंपर्क अधिकारी
एसटी महामंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here