Home Uncategorized राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा अंतिम टप्प्यात

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा अंतिम टप्प्यात

101
0

आजपासून पश्चिम महाराष्ट्रात जाणार शिवस्वराज्य यात्रा

इस्लामपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत सांगता सभा

सातारा

ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सुरू झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आजपासून अंतिम टप्प्यात पदार्पण करत आहे. आज पाटण येथील जाहीर सभेतून यात्रेचा अंतिम टप्पा सुरू होईल तर १६ ऑक्टोबर रोजी इस्लामपूर येथे जाहीर सभेच्या माध्यमातून यात्रेची सांगता होईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली व खा. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थितीत ही यात्रा आयोजित केली गेली होती. या यात्रेत आपल्या भाषणांच्या माध्यमातून जयंत पाटील आणि खा. अमोल कोल्हे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवले. राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, युवकांची बेरोजगारी, महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे रोजगार, महिलांवरील अत्याचार या सर्व गोष्टी त्यांनी लोकांसमोर मांडून भ्रष्ट सरकारच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला. ९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या यात्रेचे इस्लामपूर पर्यंत २४ दिवस पूर्ण होतील. शिवस्वराज्य यात्रा या २४ दिवसात १९ जिल्हे पूर्ण करेल. त्यासाठी यात्रा तब्बल ७३६५ किलोमीटरचा प्रवास गाठणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे बलस्थान असलेल्या सर्व मतदारसंघात ही यात्रा पोहचली असून पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन या मतदारसंघात केले आहे.

*इस्लामपूर येथे सांगता सभा अन् तीच जयंत पाटील यांच्या विजयाची सभा*

शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा इस्लामपूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. या वातावरणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर वाळवा मतदारसंघात ही सभा पार पडत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातून फुटणार व हीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विजयी सभा ठरणार अशी इस्लामपूरातील जनतेची भावना आहे.

*शिवस्वराज्य यात्रेचा पुढील तीन दिवसांचा प्रवास*

*सोमवार दि. १४ ऑक्टोबर २०२४*

दुपारी १ वाजता पाटण येथे जाहीर सभा
संध्याकाळी ७ वाजता कराड उत्तर येथे जाहीर सभा

*मंगळवार दि. १५ ऑक्टोबर २०२४*

दुपारी ३ वा. इचलकरंजी येथे जाहीर सभा
संध्याकाळी ६ वा. कागल येथे जाहीर सभा

*बुधवार दि. १६ ऑक्टोबर २०२४*

सकाळी ११ वा. वाई येथे जाहीर सभा
संध्याकाळी ५ वा. इस्लामपूर येथे जाहीर सभा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here