Home राजकीय आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत विविध महिला संस्थांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची...

आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत विविध महिला संस्थांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट

133
0

मुंबईतील सेवा सहकारी संस्था, बेरोजगार संस्था, महिला बचत गट यांच्यावर महापालिकेकडून होत असलेल्या अन्याया बाबत मुंबईतील सर्व महिला संस्थांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेटून विविध समस्यावर चर्चा केली.
यावेळी राज ठाकरे यांनी कसलीही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे असे वचन सर्व महिला भगिनींना दिले.
या बैठकीस मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस शालिनीताई ठाकरे, मनसे नेते संदीप देशपांडे, दत्तक वस्ती समितीच्या आरती ताई गावडे, सेनेचे सरचिटणीस विजय जाधव, आनिशाताई माझगावकर, राजेंद्र काळे, धनश्रीताई नाईक, वैभव भोर, प्रकाश मिस्त्री, वैष्णवी ताई सरफरे इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here