*IIT बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे व अनिकेत अंभोरेंच्या पालकांनी घेतली राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांची भेट*
*साहिल वाकोडेच्या संस्थात्मक हत्येशी संबंधित प्राध्यापकांना वाचवण्याचा प्रयत्न — खा. वर्षा गायकवाड यांचा आरोप*
*नवी दिल्ली, दि. ५ नोव्हेंबर —*
आयआयटी बॉम्बेमधील मागासवर्गीय विद्यार्थी *साहिल वाकोडे* याची संस्थात्मक हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन दीड महिना झाला तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, ज्या प्राध्यापकांवर गुन्हा दाखल आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. *वर्षा गायकवाड* यांनी केला.
*भेटीचे तपशील —*
🔹 खासदार वर्षा गायकवाड यांनी साहिल वाकोडे आणि अनिकेत अंभोरे यांच्या कुटुंबीयांसह विरोधी पक्षनेते *राहुल गांधी* आणि काँग्रेस अध्यक्ष *मल्लिकार्जुन खरगे* यांची दिल्लीत भेट घेतली
🔹 IIT बॉम्बेमध्ये मागील १३ महिन्यात ४ विद्यार्थ्यांनी जीवन संपवले — मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा छळ, खच्चीकरण होत असल्याचा आरोप
🔹 राहुल गांधी यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली — *काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे* असा विश्वास दिला
🔹 साहिलच्या वडिलांनी म्हटले — _“माझ्या मुलावर अन्याय झाला, मुलाची हत्या झाली, दोषींना वाचवले जात आहे, सरकार दखल घेत नाही म्हणून राहुल गांधींची भेट घेतली”_
साहिल वाकोडे प्रकरणी न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे.
#IITBombay #SahilWakode #RahulGandhi #VarshaGaikwad #DalitStudent #Atrocity #MaiMedia24
—























