*📌 MAI MEDIA 24 | मुंबई — दि. ६ —*
महानगरपालिका रुग्णालयांमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट व्यवस्था करणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
चिमुकल्यांच्या हास्याने उजळले ‘नंदनवन’ — हृदय व कॉक्लिअर शस्त्रक्रिया झालेल्या मुलांचा दिवाळी स्नेह मेळावा
ठाणे महापालिकेच्या धर्तीवर राज्यातील इतर महापालिका रुग्णालयांमध्येही कॉक्लिअर इम्प्लांट व अर्ली डिटेक्शन व्यवस्था सुरू करणार — यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलबार हिल येथील *’नंदनवन’* निवासस्थानी आयोजित दिवाळी स्नेह मेळाव्यात केली.
हा मेळावा *शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्यदूत फाउंडेशन* यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
*ठळक मुद्दे —*
– *९ वर्षांत १३ हजार शस्त्रक्रिया:* ११ हजार मोफत हृदय शस्त्रक्रिया + २ हजार कॉक्लिअर इम्प्लांट — २८ जिल्हे, गडचिरोली ते सांगली गावोगावी निदान.
– *श्रीनगरच्या ७२ मुलांची जबाबदारी:* मल्हार पाटेकर यांच्या माध्यमातून मागणी — सर्व मुलांना मुंबईत आणून शस्त्रक्रिया करणार — “रुग्ण देशाच्या कोणत्याही भागातील असो, उपचार होणारच.”
– *यशोगाथा:* कॉक्लिअर झालेली एक मुलगी IIT मध्ये, एका मुलाची ISRO मध्ये निवड. आदित्य ठोसरचे *’माय वर्ल्ड ऑफ साऊंड’* पुस्तकाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते.
– *५१ हजार आभारपत्रे:* मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून बरे झालेल्या रुग्णांनी पाठवलेली — *”देवदूताची आभारपत्रे तुला”* संकलन लक्षवेधी.
– *इमोशनल क्षण:* कधी हृदयाला छिद्र, कधी आवाजाचे जग बंद असलेली मुले आज हसत-खेळत दिवाळी साजरी करत होती. पालकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू.
*उपस्थित —* खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, TV9 चे मोहन देशमुख, News18 लोकमतचे मंदार फणसे, ABP माझाचे राजीव खांडेकर, Zee 24 तासचे कमलेश सुतार, Saam चे निलेश खरे, Jai Maharashtra चे प्रसाद काथे, NDTV मराठीचे जितेंद्र दीक्षित, लोकशाहीच्या अंजनी नायडू, ABP माझाच्या सरिता कौशिक, लोकसत्ताचे संदीप आचार्य, डॉक्टर, पालक.























