Home मुंबई घाटकोपरमध्ये २१ मजली इमारतीला आग — नियंत्रणात; महापौर रितू तावडे यांच्याकडून मदतकार्याचा...

घाटकोपरमध्ये २१ मजली इमारतीला आग — नियंत्रणात; महापौर रितू तावडे यांच्याकडून मदतकार्याचा आढावा

5
0

घाटकोपरमध्ये २१ मजली इमारतीला आग — नियंत्रणात; महापौर रितू तावडे यांच्याकडून मदतकार्याचा आढावा

*दिनांक ६ नोव्हेंबर २०२६*

घाटकोपर (पूर्व) येथील वल्लभ बाग परिसरातील *’रॉयल अल्टेझा’ (Royal Altezza)* या २१ मजली निवासी इमारतीच्या २० व्या मजल्यावर आज रात्री आग लागली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर *रितू तावडे* यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव व मदतकार्याची पाहणी केली आणि विविध यंत्रणांमध्ये थेट समन्वय साधला.

यावेळी स्थानिक आमदार *पराग शाह*, स्थानिक नगरसेवक *सुरेश आवळे* आणि नगरसेवक *धर्मेश गिरी* हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.

*अग्निशमन दलाची माहिती —*
मुंबई अग्निशमन दलाने ही आग *’लेव्हल-२’ (Level-II)* घोषित करत शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आग सध्या नियंत्रणात असून सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत तातडीने रिकामी करण्यात आली आहे.

मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महानगरपालिकेचे स्थानिक प्रभाग कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर मदतकार्य राबवले.

इमारतीमध्ये कोणी अडकले आहे का, याची खात्री करण्यासाठी अग्निशमन दलाकडून कसून *शोधमोहीम (Search Operation)* सुरू आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here