*निरंजन बोध्दुल यांच्या मारहाणी विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल*
*आ. देवेंद्र कोठेंच्या गुंड प्रवृत्ती विरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार*
*–प्रताप चव्हाण*
———————————————सोलापूर दि.७/११/२०२६ शिवसेनेचे जिल्हा समन्वयक निरंजन बुद्दुल यांना आ.देवेंद्र कोठे यांचे समर्थक आणि मारहाण केल्याचे प्रकार जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आला असून याबाबत संबंधित गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा रस्त्यावरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिला आहे
सध्या सोलापुरात सत्ताधारी भाजपाचे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे व काँग्रेस चे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यात राजकीय वाद सुरू असून देवेंद्र कोठे यांनी केलेल्या अपशब्दामुळे हा वाद विकोपाला पोहोचला आहे याबाबतचे बातमी शिवबा राजे youtube चैनल चे संपादक व शिवसेना जिल्हा समन्वयक निरंजन बुध्दुल यांनी सदर बातमी का छापली म्हणून आमदार देवेंद्र कोठे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात मारहाण केले त्या संदर्भी जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे फिर्याद दाखल केली आहे सदर प्रकरणाचे सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह उपजिल्हाप्रमुख विष्णू कारमपुरी(महाराज) निरंजन बोद्बूल उपस्थित होते
——————————–
*फोटोमॅटर:-शिवसेनेचे पदाधिकारी व पत्रकार निरंजन बोध्दुल यांना मारहाण झाल्याचे तक्रार अर्ज जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय पाटील यांना देताना निरंजन बोद्दूल जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण उपजिल्हाप्रमुख विष्णू कारमपूरी(महाराज)आधी दिसत आहेत*























