*BATU चे विभागीय केंद्र तातडीने सुरू करा — चंद्रकांतदादा पाटील यांचे मंत्रालयात निर्देश!*
*मुंबई (MyMedia24) -* विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या सुविधा अधिक सुलभतेने आणि वेळेत मिळाव्यात, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (BATU), लोणेरे याची विभागीय केंद्रे आणि उपकेंद्रे तातडीने सुरू करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री *चंद्रकांतदादा पाटील* यांनी आज मंत्रालयात दिले.
*कुठे सुरू होणार विभागीय केंद्र?*
BATU ची ४ विभागीय केंद्रे — *मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर* येथे सुरू होणार आहेत.
*उपकेंद्र कुठे?*
– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
– स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
– संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
– शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
– मुंबई विद्यापीठ
– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
*चंद्रकांतदादा काय म्हणाले?*
या केंद्रांच्या उभारणीसाठी सर्व संबंधित विद्यापीठांच्या कुलगुरू आणि कुलसचिवांनी आवश्यक जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. यामुळे तंत्रशिक्षणाचा विस्तार होईल आणि विद्यार्थ्यांना सुविधा वेळेत मिळतील.
*बैठकीला कोण होते?*
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अमोल मुत्याल, प्रताप लुबाळ, BATU चे प्र-कुलगुरू डॉ. विनोद मोहितकर, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव उपस्थित होते.
—
*






















