Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *इमरान खान – देशद्रोही नाही, तर मौलाना आझादांच्या वंशाचा वारस! मुलुंडच्या तिरिटचा...

*इमरान खान – देशद्रोही नाही, तर मौलाना आझादांच्या वंशाचा वारस! मुलुंडच्या तिरिटचा फुगा फुटणार?*

27
0

*इमरान खान – देशद्रोही नाही, तर मौलाना आझादांच्या वंशाचा वारस! मुलुंडच्या तिरिटचा फुगा फुटणार?*

*३६५ दिवस हाकलापट्टीच्या मोहिमा काढणाऱ्या हातोडा फेम तिरीट सोमय्यांच्या निशाण्यावर आता खान घराणं*

कायदा आणि न्यायालय आपलं काम करेल. पण कायदा बोलायच्या आधीच एखाद्याला देशद्रोही ठरवणं – हा कोणता न्याय? हाच खरा प्रश्न आहे!

आज अभिनेता इमरान खान यांच्या नावाने जे राजकारण सुरू आहे, त्यामागे सत्य कमी आणि विषारी प्रसिद्धी जास्त आहे. म्हणून या कुटुंबाचा खरा इतिहास – आपल्या भाषेत, आपल्या लोकांसाठी समोर येणं गरजेचं आहे.

*१) हे कुटुंब कोण आहे? – रक्तातच भारत!*

इमरान खान हा काही काल-परवा आलेला परका नाही.
– तो आमिर खानचा सख्खा भाचा.
– त्याची आई नुजहत खान ही ग्रेट शोमॅन नासिर हुसेन यांची मुलगी. म्हणजे इमरान हा नासिर हुसेन यांचा नातू.
– इमरानची आई ही आमिरची चुलत बहीण.
– लहानपणीच इमरानने ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ मध्ये काम केलंय. तसंच आमिरचा भाऊ फैजलने ‘प्यार का मौसम’ मध्ये बालकलाकार म्हणून काम केलं होतं – हा या घराण्याचा संस्कारच आहे.

*२) मौलाना आझादांशी थेट नातं – जे सोमय्या सांगणार नाहीत!*

ही सगळ्यात मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे, जी मुद्दाम दाबली जाते.
आमिर खान हा भारताचे पहिले शिक्षणमंत्री, स्वातंत्र्यलढ्यातील महामेरू मौलाना अबुल कलाम आझाद यांचा वंशज आहे!
ताहीर हुसेन यांची आई (म्हणजे आमिरची आजी) ही मौलानांची सख्खी पुतणी होती. म्हणजे थेट रक्ताचं नातं!

आणि ऐका – जेव्हा नासिरभाईंना सिनेमात यायचं होतं आणि घरच्यांचा कडाडून विरोध होता, तेव्हा ते कोणाकडे गेले? तर मौलाना आझादांकडे! मौलाना म्हणाले होते – “कोणाचंही ऐकू नकोस, तुझं मन जे सांगतं तेच कर!”
या एका वाक्याने दोन पिढ्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली. आमिरने तर आपल्या धाकट्या पोराचं नाव ‘आझाद राव खान’ हे मौलानांच्याच सन्मानार्थ ठेवलंय! हे देशप्रेम नाही तर काय आहे?

मौलाना हे फक्त नेते नव्हते, तर प्रचंड विद्वान, लेखक, धार्मिक अभ्यासक होते. त्यांचा वारसा सांगणाऱ्याला देशद्रोही म्हणणं – यापेक्षा मोठा विनोद कुठलाच नाही!

*३) गंगा-जमुनी संस्कृती – आमच्या रक्तात!*

या कुटुंबावर हिंदू-मुस्लिमचा शिक्का मारणाऱ्यांनी हे वाचावं:
– नासिर हुसेन यांनी शम्मी कपूर, देवानंद, धर्मेंद्र, जितेंद्र, आशा पारेख अशा हिंदू कलाकारांना घेऊन सुपरहिट दिले. त्याचबरोबर मुस्लिम कलाकारही होते – कारण कला ही कला असते, धर्म नाही!
– शम्मी कपूर आणि देवानंद यांच्या करिअरला दिशा देण्यात नासिरभाईंचा मोठा वाटा होता.
– नासिरभाईंची पत्नी आयेशा (मूळ नाव मार्गारेट लुईस – एक ब्रिटिश ख्रिश्चन) या सहाय्यक नृत्यदिग्दर्शिका होत्या. ‘बहारों के सपने’, ‘हम किसीसे कम नहीं’ मध्ये त्यांचं काम होतं.
– ताहीर हुसेन यांच्या दोन मुली – निकहत आणि फरहात. निकहतचा नवरा हेगडे – कर्नाटकातील तुलूभाषिक हिंदू ब्राह्मण! पुण्यातल्या औषध कंपनीचे CEO होते, १४ वर्षे पुण्यात राहिले! निकहतने स्वतः ‘मिशन मंगल’, ‘तान्हाजी’, ‘सांड की आँख’, ‘पठाण’ मध्ये काम केलंय.
– फरहात ही ग्राफिक डिझायनर, तिची ‘कॉन्व्हर्सेशन विथ आर्ट’ प्रदर्शनं गाजली.

*४) इमरानचं कुटुंब – हाच तर खरा भारत!*

इमरानची आई नुजहत – मानसशास्त्रज्ञ.
त्याचे वडील अनिल पाल – हिंदू, सॉफ्टवेअर इंजिनिअर, त्यांची आई ब्रिटिश! अनिल हे मन्सूर खान बरोबर IIT मुंबईत शिकले!
इमरानचा जन्म अमेरिकेत झाला, पण तो बॉम्बे स्कॉटिश स्कूल, मग कुन्नूर पब्लिक स्कूल, मग उटीच्या गुरुकुलात शिकला – जिथे वीजही नव्हती, स्वतःची कामं स्वतः करावी लागत! लहानपणी तो तोतरा होता, आत्मविश्वास नव्हता – पण त्याने स्वतःला घडवलं!

त्याचे सावत्र वडील राज झुत्शी – काश्मिरी पंडित! ‘होली’, ‘माचिस’, ‘दिल चाहता है’, ‘लक्ष्य’, ‘कयामत से कयामत तक’ मध्ये काम करणारे मोठे कलाकार. त्यांचे आजोबा दीनानाथ यांनी ‘गरम हवा’ मध्ये बलराज सहानींच्या भावाची भूमिका केली होती.

मन्सूर खान – चार सिनेमे दिग्दर्शित केले, ‘जाने तू या जाने ना’ मधून इमरानला लॉन्च केलं. आज तो लेखक आहे – ‘द थर्ड कर्व्ह’ आणि ‘वन: द स्टोरी ऑफ द अल्टिमेट मिथ’ सारखी पुस्तकं लिहितोय, जी जागतिक अर्थव्यवस्था आणि माणुसकीवर भाष्य करतात.

मन्सूरची मुलगी झेन मेरी खान – ‘कपूर अँड सन्स’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ मध्ये सहाय्यक दिग्दर्शक, ‘मिसेस सीरियल किलर’, ‘फील्स लाइक इश्क’, ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ मध्ये शालू वर्तकची भूमिका, झोया अख्तरच्या ‘मेड इन हेवन’ मध्ये काम!

इमरानने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीत शिक्षण घेतलं, पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअर मिळवला, PETA चा समर्थक आहे, ‘मिशन मार्स’ लघुपट दिग्दर्शित केला आहे.

*५) आमिर आणि या घराण्याचं समाजकार्य विसरणार का?*

ज्येष्ठ नेत्या नजमा हेपतुल्ला या आमिरच्या चुलत बहीण – मौलाना आझाद यांच्या नात. माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्याशीही या कुटुंबाचं लांबचं नातं सांगितलं जातं.

आमिरने ‘सत्यमेव जयते’ मधून देशातील कुप्रथांवर आवाज उठवला, पाणी फाऊंडेशनमधून महाराष्ट्रात पाणी अडवलं – हे समाजकार्य नाही का? नासिर हुसेन १९४८ साली फिल्मिस्तानमध्ये कमर जलालाबादी यांच्याबरोबर लेखक म्हणून काम करू लागले – तिथून लेखक, दिग्दर्शक, निर्माता – हा प्रवास!

मुळं अफगाणिस्तानच्या हेरातची असली तरी या खान घराण्याने भारतालाच आपलं मानलं आहे. लेखन, अभिनय, दिग्दर्शन – याद्वारे मनोरंजन केलंय.

*शेवटचं आणि स्पष्ट:*

इमरानवर काही आरोप असतील तर कायदा बघेल. पण त्यावरून संपूर्ण कुटुंबाला, त्यांच्या स्वातंत्र्यसैनिक वारशाला ‘देशद्रोही’ म्हणणं – हे अत्यंत संतापजनक आहे.

मुलुंडच्या किरीटने कितीही आरोप केले, कितीही हातोडे मारले, तरी या देशाची गंगा-जमुनी संस्कृती आणि आमचा इतिहास या खोट्या धव माणसामुळे बिघडू देता कामा नये! चांगल्या माणसांना विषारी राजकारणासाठी बदनाम करणं थांबलंच पाहिजे!

*जय हिंद, जय महाराष्ट्र!*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here