Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांची अनोखी गोष्ट! नव्या जोड्या, नवी केमिस्ट्री!*

*‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांची अनोखी गोष्ट! नव्या जोड्या, नवी केमिस्ट्री!*

46
0

*‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांची अनोखी गोष्ट! नव्या जोड्या, नवी केमिस्ट्री!*

काही जोड्या सहज जुळतात, तर काहींसाठी खास योग जुळावा लागतो. असाच योग जुळून आला आहे ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाच्या निमित्ताने! *मुक्ता बर्वे-प्रियदर्शन जाधव* आणि *आरती वडगबाळकर-अंशुमन विचारे* या जोड्या पहिल्यांदाच एकत्र आल्या असून, त्यांची केमिस्ट्री २३ ऑक्टोबरला भेटीला आलेल्या या नाटकाचे खास आकर्षण ठरणार आहे.

‘रंगमाया’ आणि ‘अष्टविनायक’ निर्मित, लेखन – देबू बर्वे, दिग्दर्शन – मीरा वेलणकर. निर्माते – मुक्ता बर्वे, मीरा वेलणकर, दिलीप जाधव. नेपथ्य/प्रकाश – प्रदीप मुळ्ये, गीत – वैभव जोशी, संगीत – श्रीनाथ म्हात्रे, पार्श्वसंगीत – संतोष जगदाळे, स्वर – वैशाली माडे, अभय जोधपूरकर.

‘पुन्हा नक्की भेटू’ हे केवळ निरोपाचे शब्द नाहीत, तर नातं जपण्याचं सुंदर आश्वासन आहे – याच भावनेला स्पर्श करणारं हे नाटक निखळ आनंदासोबत भावनांच्या विश्वात घेऊन जाणार आहे.

*- MAI MEDIA 24 Entertainment Desk*

*टॅग्स:* #PunhaNakkiBhetu #MuktaBarve #PriyadarshanJadhav #MarathiNatak

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here