इलेक्ट्रिक बस साठी चार्जिंग स्टेशनचे उदघाटन
कांदिवली
उत्तर मुंबईतील सर्वात मोठा म्हणजे ७५ फूट उंचीवर राष्ट्रध्वजाचे बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेश द्वाराच्या मध्यभागी अनावरण करण्यात आले. शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मंगलप्रभात लोढा यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या शुभ प्रसंगी मुख्य वन संरक्षक, संचालक जी मल्लिकार्जुन, जिल्हा धिकारी जिल्हा दांडाधिकारी मुंबई उपनगर राजेंद्र क्षीरसागर, उपसंचालक रेवती कुलकर्णी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गुंजन दिघावकर सह पर्यटक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उत्तर मुंबईतील सांस्कृतिक नगरी म्हणून बोरिवली ओळखली जाते. याच बोरिवलीतील मुंबईचे फुप्फुस मानले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात उत्तर मुंबईतील सर्वात मोठा राष्ट्रध्वज असावा, यासाठी
भाजप उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर मागील 7 वर्षांपासून प्रयत्नशील होते. यासाठी जिल्हा विकास निधीतून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच त्यांनी प्रशासनाला काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. आलेल्या मान्यवारांना मुख्य वन संरक्षक मल्लिकार्जुन यांनी प्राण्यांच्या प्रतिकृती भेट देऊन स्वागत केले.
तसेच मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धावणाऱ्या 6 इलेक्ट्रिक बस साठी नव्याने उभारण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनंचे उदघाटन आमदार सुनिल राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
रेवती कुलकर्णी उपसंचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
या राष्ट्रीय उद्यानाला दरवर्षी 20 लाख पर्यटक भेट देतात, इलेक्ट्रिक बसेस मुळे लायन्स सफारी आणि काणेरी केव्हज हा प्रवास माफक दरात आणि आनंद दायी होणार आहे.
मंगल प्रभात लोढा
शासनाने 25 कोटी फंड दिला असल्याने,पर्यटकांसाठी
नवीन सुख सोयी उपलब्ध होणार आहेत. अधिकाऱ्यांना धन्यवाद देत. अनावरण करण्यात आलेल्या 75 फूट उंच राष्ट्रीय ध्वजा जवळ रोज सकाळी साडेसात वाजता स्थानिक नागरिक, उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांमार्फत सामूहिक राष्ट्रगान होणार आहे.हे अभिमानास्पद आहे. या साठी पाठपुरावा करणारे जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर यांचे विशेष आभार व्यक्त केले.

















