—
*MAI MEDIA 24 – चित्रपट समीक्षा*
*दशमी – रावण दहनाचा नव्या अर्थाने शोध*
*रेटिंग: ★★★★★ ५/५*
*- प्रो. शीतल हरीश करदेकर*
23 ऑक्टोबरपासून प्रदर्शित झालेला ‘दशमी’ हा दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरील एक प्रामाणिक प्रयत्न आहे. दिग्दर्शकाने रावण दहन हे केवळ परंपरा म्हणून न दाखवता, त्यामागचा आजच्या काळातला न्यायाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केलाय.
*कथा आणि मांडणी:*
प्रभाकर देसाई या हॉस्पिटलमधील निवृत्त होणाऱ्या बापाची आणि डॉक्टर होणाऱ्या लेकीची, तिच्या प्रेमाची कथा आहे. ही कथा दिल्लीच्या निर्भयाच्या कथेवरून प्रेरित आहे असे म्हणतात, पण त्याहीपेक्षा वेगळा विषय आणि चांगला संदेश सिनेमातून मिळतो.
खरा रावण कोण हे सस्पेन्स उत्तम टिकवून ठेवलाय. दशमीचे दिवशी सिनेमाचा शेवट होतो. बाप लेकीला जो सन्मान देतो तो आणि शेवट लक्षात राहणारा प्रभावी आहे. कथा कुठेही संथ होत नाही.
*अभिनय:*
गौरी इंगवले ने लक्ष्मीची भूमिका दमदारपणे साकारली आहे. मकरंद अनासपुरे यांचा भावनिक ठाम अभिनय लक्षात राहतो. रवि प्रकाश यांचा SP आसिफ मुजावर उत्तम प्रभाव टाकतो. लक्ष्मी बरोबरचा दुर्गा पूजेचा प्रसंग सर्वात प्रभावी.
महेश मांजरेकर व रवि प्रकाश समोरासमोर येतात तो प्रसंग लक्षात राहतो. वासूच्या भूमिकेत राज कुंदन प्रेमळ आणि वेगळा अभिनय करतो. महिला इन्स्पेक्टर लक्षात राहते. बंटी म्हात्रेच्या भूमिकेत योगेश भोसले, मल्हार काकाच्या भूमिकेत विजय निकम छाप सोडतात.
*तांत्रिक बाजू:* वातावरण निर्मितीत सरस, पार्श्वसंगीत, उत्तम छायांकन, वेशभूषा रंगभूषा प्रभावी.
*एकूण:* ‘दशमी’ परफेक्ट नाही, पण एक प्रामाणिक मजबूत प्रयत्न आहे. *संपूर्ण कुटुंबासह पहावा – पॉवर पॅक.* समाजातील ‘रावण’ संपवण्यासाठी ‘WE WANT JUSTICE’ ही भावना तो मांडतो.
*लक्ष्मी नव्हे दुर्गा चामुंडाच तू*
*- प्रो शीतल हरीश करदेकर*
—
*चित्रपट – ‘दशमी’*
*KNK BOX प्रस्तुत*
निर्मिती-दिग्दर्शन – योगेश पांडुरंग भोसले
कथा, पटकथा, संगीत – सुरेश पंडित
संवाद – ऋषिकेश गुप्ते, अमित बेंद्रे, सुरेश पंडित
छायांकन – विकास सिंग | संकलन – विनय शिंदे | कला – आनंद साठे
*कलाकार:* महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, गौरी इंगवले, रवि प्रकाश, विजय निकम, राज कुंदन, योगेश भोसले आदी.
*Editor: Pro. Shittal Harish Kardekar | https://maimedia24.com*
*वृत्त : जे सत्य सांगते; सद रक्षणाय, खल दमनाय.*






















