Home मुंबई *उल्हासनगर सनद वाटप घोटाळा – चौकशी नाही – २८ ऑक्टोबरपासून आझाद मैदानात...

*उल्हासनगर सनद वाटप घोटाळा – चौकशी नाही – २८ ऑक्टोबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे*

32
0

*MAI MEDIA 24 | मंत्रालय – विशेष*

*उल्हासनगर सनद वाटप घोटाळा – चौकशी नाही – २८ ऑक्टोबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे*

*मुंबई, दि. १२ ऑक्टोबर २०२६ -*

उल्हासनगर येथील उपविभागीय अधिकारी
. विजयानंद शर्मा* यांच्यावर सनद वाटपात शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते *नोवेल साळवे (ठाणे जिल्हा)* यांनी अपर मुख्य सचिव, महसूल विभाग, मंत्रालय यांना निवेदन दिले आहे.

*निवेदनातील ठळक मुद्दे:*

*संदर्भ:* दि. २३/०९/२०२६ रोजी आझाद मैदान येथे केलेल्या बेमुदत उपोषणाची दखल घेऊन राज्य शासनाने कोकण आयुक्त व ठाणे जिल्हाधिकारी यांना चौकशीचे निर्देश दिले होते.

*आरोप:* त्या निर्देशांनंतरही पारदर्शक कारवाई झाली नसल्याचा दावा साळवे यांनी केला आहे. सनद वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप.

*मागणी:*
१. श्री. विजयानंद शर्मा यांना निलंबित करावे
२. त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी
३. संपूर्ण प्रकरणाची चौकशी *CBI मार्फत* व्हावी

*इशारा:* पत्र दिल्यापासून १५ दिवसांत कारवाई न झाल्यास – *दि. २८/१०/२०२६ पासून आझाद मैदान, मुंबई येथे पुन्हा बेमुदत उपोषण* करणार – आणि उपोषणादरम्यान काही बरे-वाईट घडल्यास जबाबदारी महसूल विभागाची राहील – असे निवेदनात म्हटले आहे.

सोबत पूर्वीच्या सर्व पत्रव्यवहाराच्या झेरॉक्स प्रती जोडल्या आहेत.

*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24 @maimedia24*

#Ulhasnagar #SanadGhotala #AzadMaidan #NovelSalve #RevenueDepartment #MAIMEDIA24

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here