ओबीसी हक्कांच्या लढ्याला नवी दिशा देण्यासाठी नागपुरात राष्ट्रीय रणनीती बैठकीला सुरुवात
संवैधानिक न्याय, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आणि जातनिहाय जनगणनेची मागणी अधिक बळकट करण्यासाठी सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ओबीसी रणनीती बैठकीला नागपुरात सुरुवात झाली आहे.
देशभरात स्वतंत्र ओबीसी कॉलमसह जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसी समाजाला न्याय्य हक्क मिळावेत आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, या प्रमुख मागण्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांच्या लढ्याची पुढील दिशा आणि आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे
बैठकीत विविध ओबीसी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी






















