Home मुख्य बातम्या नाना पाटेकरांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात शोककळा*- *पंतप्रधान मोदींपासून देशातील मुख्यमंत्री,...

नाना पाटेकरांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात शोककळा*- *पंतप्रधान मोदींपासून देशातील मुख्यमंत्री, राज्यातील मंत्री आणि मराठी रंगकर्मी ते बॉलिवूडपर्यंत दिग्गजांनी शब्दांजली *

95
0

*नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड*-
*पंतप्रधान मोदींपासून देशातील मुख्यमंत्री, राज्यातील मंत्री आणि मराठी रंगकर्मी ते बॉलिवूडपर्यंत दिग्गजांनी शब्दांजली * –

माई मीडिया 24 – प्रो. शीतल करदेकर:*

ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते विश्वनाथ ऊर्फ नाना पाटेकर (वय ७५) यांचे आज गुरुवारी पहाटे गोवा येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री, कलावंतांपर्यंत सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचे अंत्यसंस्कार आज सायं ५ वा. पुणे-डोणजे येथे शासकीय इतमामात होणार आहे.

*— राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया —*

*१. पंतप्रधान नरेंद्र मोदी:*
“तीव्रता, वेगळेपण आणि अमीट उपस्थिती असलेले अभिनेते हरपले. त्यांच्या अष्टपैलूत्वाने पिढ्यानपिढ्या लक्षात राहतील अशी पात्रे निर्माण केली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.”

*२. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:*
“पडद्यावर जितके भव्य तितकेच मनाने मोठे होते. क्रांतीवीरमधील त्यांची देशभक्तीची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजली. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवारमध्ये त्यांनी गावागावात जाऊन काम केले. त्यांचे जाणे ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे.”

*३. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे:*
“महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी माणसाची शान हरपली. मी एक खरा, दिलदार मित्र गमावला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार.”
काश्मीरमध्ये शाळा सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न मी पूर्ण करेन.

*४. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार:*
“अभिनयातील अस्सल अभिव्यक्ती आणि संवेदनशील सामाजिक जाणीव यांचा संगम म्हणजे नाना पाटेकर. नाना पाटेकरांचे अजित दादांसोबत अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते, ही आमच्या कुटुंबाची वैयक्तिक हानी आहे.”

*५. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह:*
“नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते तर एक संस्था होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेत कच्चे, बिनधास्त सत्य ओतले.”

*६. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार:*
“मराठी माणसाच्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. शेतकरी ते जवान सर्वांसाठी ते ढाल होते.”

*७. मराठी भाषा व उद्योग मंत्री ना. उदय सामंत – “एका सेवाभावी युगाचा अंत झाला”:*
“पावसच्या गौतमी नदीच्या खोलीकरणाच्या कामापासून ते नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला. काही दिवसांपूर्वी याच व्यासपीठावरून त्यांनी संवाद साधला होता, आज ते आपल्यात नाहीत ही वेदना देणारी बाब आहे.”

*८. विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर – “संवेदनाशील आणि प्रखर कलावंत हरपला”:*
“त्यांचा आवाज म्हणजे सामान्य माणसाचा आवाज होता. क्रांतीवीरमधून त्यांनी व्यवस्थेला सवाल केला, तर नटसम्राटमधून माणुसकीचे दर्शन घडवले. मुंबई-गिरणगाव आणि मराठी रंगभूमीशी त्यांचे नाते अतूट होते. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य राजकारण्यांनाही लाजवेल असे आहे.”

*९. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे:*
“मराठी रंगभूमीचा आधारस्तंभ हरपला. ‘पुरुष’ मधील गुलाबराव ते ‘नटसम्राट’ पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.”

*१०. खासदार सुनिल तटकरे:*
“अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य अमूल्य आहे.”

*— कलावंत आणि नाट्यसृष्टीच्या प्रतिक्रिया —*

*११. नाट्यनिर्माता उदय धुरत [ज्यांनी नानाला रंगभूमीवर आणले]:*
“माझ्या माऊली प्रॉडक्शनच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकातून नाना पाटेकर याने रंगभूमीवर पदार्पण केले होते. सत्तार ची अत्यंत प्रभावी भूमिका त्याने साकारली होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. भावपूर्ण श्रद्धांजली.”

*१२. मकरंद अनासपुरे (नाम फाऊंडेशन):*
“माझा भाऊ गेला. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही दोघांनी नाम सुरू केले, आज त्यातील अर्धा जीव निघून गेला. निःशब्द आहे.”

*१३. अक्षय कुमार (बॉलिवूड):*
“ते असे दुर्मिळ अभिनेते होते ज्यांना लक्ष वेधण्यासाठी जास्त काही करावे लागत नसे. तो आवाज, ती तीव्रता, प्रत्येक भूमिकेतील प्रामाणिकपणा – ते पूर्णपणे स्वतःचे होते.”

*१४. सयाजी शिंदे:*
“नाना म्हणजे विद्यापीठ होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी पोरकी झाली. निःशब्द झालो आहे.”

*१५. सचिन तेंडुलकर / विराट कोहली / अजिंक्य रहाणे:*
“जमिनीवर पाय असलेले, सरळ व्यक्तिमत्व. त्यांचे कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. ओम शांती.”

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here