**धुळे ग्रामीणमध्ये ८७ वीजचोरी प्रकरणे उघड; वरिष्ठ तंत्रज्ञ व सहाय्यक अभियंत्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप – वर्कर्स फेडरेशनची MD कडे निलंबनाची मागणी*
*दिवाळीपूर्वी वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना २५ हजार बोनस द्या वर्कर्स फेडरेशनची मुख्यमंत्री व ऊर्जा विभागाकडे मागणी*
*मुंबई/धुळे, दि. 6 ऑक्टोबर -* महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत असताना धुळे ग्रामीण विभागात मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. कृष्णा भोयर यांनी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र देऊन निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार दक्षता विभागाच्या भरारी पथकाने (कल्याण मंडळ-1, जळगाव, कल्याण) साक्री शाखा अंतर्गत अंबापूर, काशीपूर, पंढरपूर, देवनगर गावांमध्ये कारवाई केली. यात 87 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली.
*ग्रामस्थांचे जबाब:* अनेक वर्षांपासून लघु विद्युत वाहिनीवर अनधिकृत जोडण्या देण्यात आल्या. यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. जी.अ. वाघ आणि सहाय्यक अभियंता साक्री (शहर) श्री. हेमंत अहिरे यांनी अवास्तव रक्कम घेतल्याचे ग्रामस्थांनी लेखी-तोंडी जबाबात म्हटले आहे. वीज बिलाची रक्कम घेऊनही महिने भरणा न करणे, सिंगल/थ्री फेज रोहित्र अनधिकृतपणे बसवून पैसे घेणे, मीटर न बसवणे असे प्रकार घडले.
*RDSS घोटाळा:* सर्वात गंभीर म्हणजे RDSS स्कीम अंतर्गत ओव्हरलोड कमी करण्यासाठी मंजूर झालेले 25 KVA चे 14-15 थ्री फेज रोहित्र परस्पर वैयक्तिक ग्राहकांना लाखो रुपये घेऊन विकले. तसेच कृषीपंप ग्राहकांना 63 KVA ऐवजी 100 KVA चे रोहित्र बसवून 63 KVA चे रोहित्र लपवून ठेवल्याचा आरोप आहे. मेंटेनन्सही खाजगी एजन्सीकडून करून घेतल्याचे उघड झाले.
“एकीकडे कर्मचारी रात्रंदिवस महसूल वाढीसाठी काम करत असताना दुसरीकडे काही अधिकारी महसूल बुडवत आहेत, हे घातक आहे. संबंधितांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करावी,” अशी मागणी फेडरेशनने केली आहे.
*तर दुसरीकडे दिवाळी बोनस २५ हजारची मागणी केलीय*
-* सन 2025-26 या आर्थिक वर्षात तिन्ही वीज कंपन्यांनी विक्रमी नफा कमावल्याने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये सानुग्रह अनुदान/बोनस द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केली आहे.
फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. मोहन शर्मा आणि सरचिटणीस कॉ. कृष्णा भोयर यांनी अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) व व्यवस्थापकीय संचालक, सूत्रधारी कंपनी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे –
*नफ्याची आकडेवारी:*
– *महानिर्मिती:* 7063.39 MUS विक्रमी निर्मिती, 39,576.24 कोटी महसूल, 722.42 कोटी नफा (टॅक्सनंतर 451.98 कोटी निव्वळ)
– *महापारेषण:* 11,144 कोटी महसूल, 1649 कोटी टॅक्सनंतर 2438 कोटी निव्वळ नफा
– *महावितरण:* 1,34,560.97 कोटी महसूल, 1234.16 कोटी निव्वळ नफा – सोलर कृषी पंपात जागतिक विक्रम
“अपुरे संसाधन, खराब कोळसा, राजकीय हस्तक्षेप आणि अपुरे मनुष्यबळ असतानाही कर्मचारी, अभियंते, अधिकारी, सहाय्यक व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे 25 हजार सन्मानजनक बोनस दिवाळीपूर्वी द्यावा,” अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिन्ही कंपन्यांचे संचालक यांना पाठवण्यात आली आहे.
*संपादक : प्रो. शीतल हरीश करदेकर | http://www.mai24media.com*






















