Home मुंबई *खासदार रवींद्र वायकर यांच्या ५ वर्षांच्या पाठपुराव्याला यश! इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये १५०...

*खासदार रवींद्र वायकर यांच्या ५ वर्षांच्या पाठपुराव्याला यश! इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये १५० फुटांचा राष्ट्रध्वज आणि ३२० क्षमतेचे महिला वसतिगृह मंजूर – मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ग्रीन सिग्नल*

49
0

> *खासदार रवींद्र वायकर यांच्या ५ वर्षांच्या पाठपुराव्याला यश! इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये १५० फुटांचा राष्ट्रध्वज आणि ३२० क्षमतेचे महिला वसतिगृह मंजूर – मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ग्रीन सिग्नल*

मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रविंद्र वायकर यांनी २०२० पासून उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सचिव यांच्याकडे पत्रव्यवहार आणि तारांकित प्रश्नाद्वारे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. जोगेश्वरी (पूर्व) येथील ६०००+ विद्यार्थी असलेल्या ऐतिहासिक इस्माईल युसूफ महाविद्यालयात –

1️⃣ *१५० फूट भव्य राष्ट्रध्वज* – पंतप्रधान मोदींच्या ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत तरुणांमध्ये देशभक्ती जागवण्यासाठी
2️⃣ *३२० क्षमतेचे महिला वसतिगृह* – राज्यभरातून, देशभरातून मुंबईत शिक्षण-नोकरीसाठी येणाऱ्या मुलींसाठी सुरक्षित निवास – पहिल्या टप्प्यात १३.५० कोटी मंजूर

मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी प्रस्ताव लवकर पाठवण्याचे आदेश संचालकांना दिले आहेत. NOC मिळताच PWD कडून काम सुरू होणार, निधी न मिळाल्यास खासदार निधीतून काम करण्याची तयारी वायकर यांनी दर्शवली आहे.

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here