Home मुंबई ना.संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे खळबळ*

ना.संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे खळबळ*

68
0

*ना.संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे खळबळ*

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या एका वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा जोरात आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देताना शिरसाट यांनी, “मी २०२२ मध्ये खूप झकमारी केली, म्हणून मंत्री झालो,” असे वक्तव्य केले.

शिरसाट यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना वेग आला असून, विरोधकांकडूनही या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. २०२२ मधील राज्यातील राजकीय घडामोडी आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांच्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे.

कार्यक्रमात बोलताना शिरसाट यांनी त्या काळातील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करताना आपल्याला मंत्रीपद मिळण्यापुर्वी मोठा संघर्ष करावा लागल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता २०२२ मधील राजकीय घडामोडींवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, विरोधकांनी शिरसाट यांच्या वक्तव्याचा आधार घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या वक्तव्याचा नेमका राजकीय संदर्भ काय, यावरूनही विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.

दुसरीकडे, शिरसाट समर्थकांकडून मात्र त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. शिरसाट यांचा उद्देश आपल्या राजकीय संघर्षाचा आणि मेहनतीचा उल्लेख करण्यापुरताच होता, असे समर्थकांचे म्हणणे आहे.

शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे २०२२ मधील राजकीय घडामोडींची आठवण पुन्हा ताजी झाली असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय रंग गडद होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here