*राजकारणाचे साहित्यात प्रतिबिंब उमटले पाहिजे – डॉ. नीलम गोऱ्हे*
*उप-हेड: दहावे नांदी साहित्य संमेलन उत्साहात – राजकीय साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदावरून साहित्य आणि सामाजिक भानावर भर*
*सासवड, दि. १ ऑक्टोबर -*
सामाजिक जीवन ज्यावेळी व्यक्त होते, तेथून साहित्याची निर्मिती होते. त्यामुळे राजकारण आणि साहित्य यांचा जवळचा संबंध असून, आचार्य अत्रे यांच्याप्रमाणे राजकारणाचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. साहित्याच्या माध्यमातून समाजातील प्रश्न, संघर्ष आणि अनुभव व्यक्त झाले पाहिजेत, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या, विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, समर्थ युवा फाऊंडेशन, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर, मासाप सासवड, सोपाननगर, जेजुरी शाखांच्या वतीने गुरुवारी १० वे नांदी साहित्य संमेलन ‘राजकीय साहित्य संमेलन’ म्हणून आयोजित केले होते. अध्यक्षपदावरून डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.
*डॉ. गोऱ्हे म्हणाल्या -*
– राजकारणात काम करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या असल्या तरी राजकीय साहित्य व्यापक विषय आहे. कायदे, ठराव, मसुदे करताना समाजाची पार्श्वभूमी समजणे गरजेचे.
– लोकांच्या संघर्षातून साहित्य व लोकगीते जन्माला येतात – संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांचे योगदान.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून वैचारिक साहित्य निर्मिती केली, वि.स. पागे यांच्या विधिमंडळावरील लेखनातून मराठीची समृद्धी दिसते.
– अटल बिहारी वाजपेयी, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण यांच्या लेखनपरंपरेचा संदर्भ – यशवंतरावांच्या आत्मचरित्रातून महाराष्ट्राचा इतिहास उलगडतो.
– आचार्य अत्रे व बाळासाहेब ठाकरे यांच्यात तीव्र वैचारिक संघर्ष असला तरी आपलेपणा होता – “मतभेद असले तरी मनभेद होता कामा नये”.
*सोशल मीडियावरील भाषेबाबत गांभीर्य हवे -*
समाजमाध्यमांवरील भाषा माणसाचा माणसावरील विश्वास कमी करणारी आहे. त्यामुळे चांगले साहित्य लिहिणाऱ्यांवर बंधने येत आहेत. साहित्यातून संवादाचे पूल टिकले पाहिजेत.
*वाचनातून लेखनाची प्रेरणा -*
आत्या विजया जहागीरदार व पणजोबा उत्तम लेखक. शालेय जीवनापासून वाचन संस्कार – वयाच्या १९ व्या वर्षी उत्कृष्ट कथा पुरस्कारानंतर लेखन प्रवास सुरू. कथा, कादंबऱ्या, कविता लेखन.
*महिलांसाठी संदेश -*
हुंडाबळी व अत्याचाराविरोधात स्त्री आधार केंद्राद्वारे काम सुरू. पीडित मुलीच्या पाठीशी आई-वडील, भावाने ठाम उभे राहावे. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा.
यावेळी मासाप अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले – १०० व्या साहित्य संमेलनानिमित्त जिथे जिथे संमेलने झाली तिथे नांदी संमेलन आयोजित करत आहोत.
कार्यक्रमास कार्यवाह सुनील महाजन, स्वागताध्यक्ष विजय कोलते, नगराध्यक्षा आनंदी जगताप, अॅड. दिलीप निरगुडे, प्राचार्य धनाजी नागणे, डॉ. नानासाहेब पवार, अॅड. प्रकाश खाडे, अंजली गाडे, ज्योती वाघमारे आदी उपस्थित होते.
*मुलाखत -* मासाप पुणे विभाग प्रमुख राजन लाखे यांनी घेतली.
—
*Maimedia24 टॅग:* #NeelamGorhe #NandiSahitya #Saswad #SahityaSammelan #Maimedia24






















